jay shah asian cricket council meeting  twitter
क्रीडा

ICC चेअरमन बनताच Jay Shah यांचा ऐतिहासिक निर्णय! केली मोठी घोषणा

Ankush Dhavre

Jay Shah On Womens Under 19 T20 Asia Cup: बीसीसीआयचे सचिव जय शहा यांची काही दिवसांपूर्वी आयसीसी चेअरमनपदी निवड करण्यात आली आहे. येत्या १ डिसेंबरपासून त्यांचा चेअरमनपदाचा कार्यकाळ सुरू होणार आहे. ते अजूनही बीसीसीआय सचिव आणि एशियन क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष आहेत. दरम्यान एशियन क्रिकेट काऊन्सिलचे अध्यक्ष म्हणून त्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. महिला क्रिकेटला वाव देण्यासाठी त्यांनी acc महिला अंडर १९ टी -२० एशिया कप स्पर्धेची घोषणा केली आहे.

जय शहा १ डिसेंबरपासून आयसीसीचं चेअरमन पद स्वीकारणार आहेत. हे पद स्वीकारण्यासाठी त्यांना बीसीसीआयचं सचिवपद आणि एशियन क्रिकेट काऊन्सिलचं अध्यक्षपद सोडावं लागेल. दरम्यान त्यांनी हे पद सोडण्यापूर्वी एक बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी महिला क्रिकेटबाबत मोठा निर्णय घेतला. गेल्या वर्षी पहिल्यांदाच महिलांची अंडर १९ वर्ल्ड कप स्पर्धा ही टी -२० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात आली होती. आता जय शहा यांनी एशिया कप स्पर्धाही टी -२० फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे.

पुढच्या वर्षीच्या सुरुवातीच्या काही महिन्यांमध्ये आयसीसी अंडर १९ टी -२० वर्ल्डकप स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. त्यामुळे ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी एशिया कप महिला अंडर १९ एशिया कप स्पर्धेचे आयोजन केले जाऊ शकते. माध्यमातील वृत्तानुसार ही स्पर्धा डिसेंबर महिन्यात आयोजित केली जाऊ शकते.

काय म्हणाले जय शहा?

ही ऐतिहासिक घोषणा करताच जय शहा म्हणाले की, ' हा एशियन क्रिकेटसाठी ऐतिहासिक क्षण आहे. महिला अंडर १९ एशिया कप स्पर्धेची सुरुवात हा आमच्यासाठी अभिमानास्पद क्षण आहे. हा एक असा स्टेज आहे, जिथे युवा खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे. आम्ही घेतलेल्या निर्णयांचा काय परिणाम होणार, याचा विचार करून आम्हाला खूप अभिमान वाटतोय.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Live Updates : पुण्यात काचेच्या कारख्यान्यात माल उतरवताना दोघांचा मृत्यू

Beed News : बीडमध्ये भाजप नेत्याचे बंडखोरीचे संकेत; माजलगाव मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी

Bigg Boss Marathi: बिग बॉसच्या घरामध्ये पुन्हा एकदा राडा; सूरजमुळे निक्की आणि अंकिता भिडले..

National Flower: चंपा हे कोणत्या देशाचे राष्ट्रीय फूल आहे?

Vijaykumar Gavit: विधानसभेपूर्वी नंदुरबारमध्ये महायुतीला मोठा धक्का, गावितांची भाजपाला सोडचिठ्ठी, तुतारी फुंकणार

SCROLL FOR NEXT