आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदने (आयसीसीने) मंगळवारी (२७ ऑगस्ट) मोठी घोषणा केली आहे. बीसीसीआय सचिव जय शहा यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. येत्या १ डिसेंबरपासून त्यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ सुरू होणार आहे.
यासह जय शहा हे आयसीसीचे अध्यक्षपद भुषवणारे पाचवे भारतीय ठरले आहेत. दरम्यान यापूर्वी हे पद भुषवणारे ४ भारतीय कोण? जाणून घ्या.
जगमोहन डालमिया हे आयसीसीचं अध्यक्षपद भुषवणारे पहिले भारतीय होते. सुरुवातीला बीसीसीआय ही श्रीमंत क्रिकेटपटूंच्या बोर्डांच्या यादीत खूप मागे होती. मात्र जगमोहन डालमिया यांच्या कार्यकाळात बीसीसीआय सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड बनला. जगमोहन डालमिया हे १९९७ ते २००० अशी ३ वर्ष आयसीसीचे अध्यक्ष होते.
भारतातील दिग्गज नेते शरद पवार यांनी देखील आयसीसीचे अध्यक्षपद भुषवले आहे. त्यांनी २०१० ते २०१२ या काळात आयसीसीच्या अध्यक्षांची भूमिका पार पाडली. यापूर्वी २००५ ते २००८ दरम्यान त्यांनी आयसीसीच्या अध्यक्षांची भूमिका पार पाडली. त्यानंतर त्यांना आयसीसीचं अध्यक्षपद भुषवण्याची संधी मिळाली.
चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सह मालक आणि प्रसिद्ध उद्योगपती एन श्रीनिवासन यांना देखील आयसीसीचं अध्यक्षपद भुषवण्याची संधी मिळाली आहे. मात्र त्यांना केवळ १ वर्ष हे पद सांभाळता आलं. त्यांचा कार्यकाळ २०१४ मध्ये सुरु झाला आणि २०१५ मध्ये समाप्त झाला.
शशांक मनोहर यांनी ५ वर्ष आयसीसी अध्यक्ष म्हणून काम केलं. पेश्याने वकील असणाऱ्या शशांक मनोहर यांनी आधी २००८ ते २०११ दरम्यान बीसीसीआयच्या अध्यक्षांची भूमिका पार पाडली. त्यानंतर २०१५ ते २०२० पर्यंत त्यांना आयसीसीचं अध्यक्षपद भुषवण्याची संधी मिळाली.
जय शहा यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. या पदावर निवड होताच त्यांनी इतिहास रचला आहे. ते आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड होणारे सर्वात युवा अध्यक्ष ठरले आहेत. यासह पाचवे भारतीय ठरले आहेत. त्यांची वयाच्या ३५ व्या वर्षी या पदावर निवड झाली आहे. दरम्यान १ डिसेंबरपासून ते हे पद सांभाळणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.