BCCI Jay Shah: जय शहांनंतर कोण होणार BCCI चा सचिव? BJP च्या दिग्गज नेत्याच्या मुलाचं नाव चर्चेत!

BCCI Jay Shah: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयचे ( BCCI ) सचिव जय शहा ( Jay shah ) आयसीसीचे अध्यक्ष बनण्याची शक्यता अधिक वर्तवण्यात येतेय. जय शहांनंतर बीसीसीआयच्या सचिवपदी कोणाची वर्णी लागणार हा प्रश्न देखील आता उपस्थित होताना दिसतो.
Rohan Jaitley
Rohan Jaitley
Published On

BCCI Jay Shah: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयचे ( BCCI ) सचिव जय शहा ( Jay shah ) आयसीसीचे अध्यक्ष बनण्याची शक्यता अधिक वर्तवण्यात येतेय. जय शहांनंतर बीसीसीआयच्या सचिवपदी कोणाची वर्णी लागणार हा प्रश्न देखील आता उपस्थित होताना दिसतो.

आयसीसीच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याची सर्वांनाच उत्सुकता आहे. असातच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड म्हणजेच बीसीसीआयचे ( BCCI ) सचिव जय शहा ( Jay shah ) आयसीसीचे अध्यक्ष बनण्याची शक्यता अधिक वर्तवण्यात येतेय. मिळालेल्या माहितीनुसार, आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी तिसऱ्यांदा उमेदवारी न घेण्याचा निर्णय घेतला असल्याने सध्या हे पद रिक्त आहे.

आयसीसी ( ICC ) अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २७ ऑगस्ट असून २६ ऑगस्ट रोजी सायंकाळी उशिरापर्यंत जय शहा अर्ज भरतील असा अंदाज लावण्यात येतोय. मात्र जय शहांनंतर बीसीसीआयच्या सचिवपदी कोणाची वर्णी लागणार हा प्रश्न देखील आता उपस्थित होताना दिसतो.

जय शहा होणार आयसीसीचे अध्यक्ष?

जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यानंतर बीसीसीआयच्या सचिव पदाची जागा रिकामी होणार आहे. बीसीसीआय सचिव म्हणून जय शहा यांचा अजून एक वर्षाचा कार्यकाळ बाकी असून ICC चेअरमन झाल्यानंतर त्यांना चार वर्षे बीसीसीआयमध्ये कोणतंही पद भूषवण्यास मनाई आहे.

Rohan Jaitley
Women's T20 WC: ICC कडून T20 World Cup चे सुधारित वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी होणार भारत-पाकिस्तानचा सामना

कोण होणार बीसीसीआयचं नवं सचिव?

दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्य सचिव पदासाठी एका नावाची जोरदार चर्चा आहे. हे नाव म्हणजे रोहन जेटली. भारतीय जनता पक्षाचे दिवंगत नेते अरुण जेटली यांचा मुलगा आहे रोहन जेटली. त्यामुळे रोहन बीसीसीआयचे पुढील सचिव होऊ शकतात, असी शक्यता वर्तवण्यात येतेय. रोहन सध्या दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनचा (DDCA) अध्यक्ष आहेत.

Rohan Jaitley
Aryaman Birla: विराट, धोनी नव्हे, हा आहे भारताचा सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू! संपत्ती ऐकून धक्काच बसेल

रोहन जेटली का मानले जातायत प्रबळ दावेदार?

रोहन जेटली हे भाजपचे माजी दिग्गज नेते अरुण जेटली यांचे पुत्र आहेत. असं मानलं जातं की, अरुण जेटली यांचा बीसीसीआयमध्ये मोठ्या प्रमाणात दबदबा होता. त्यामुळे रोहन जेटली यांची बीसीसीआयवरही मजबूत पकड आहे. DDCA अध्यक्ष म्हणून रोहन जेटली यांचा हा दुसरा टर्म सुरु आहे. शिवाय रोहन यांना खेळाची देखील माहिती आहे. दिल्ली प्रीमियर लीगचे आयोजन त्यांनी यापूर्वी केलं होतं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com