Women's T20 WC: ICC कडून T20 World Cup चे सुधारित वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी होणार भारत-पाकिस्तानचा सामना

Women's T20 WC Scheduled: महिला T२० विश्वचषक स्पर्धेत एकूण १० संघ सहभागी होणार आहेत. हे दोन गटात विभागलेले आहेत. ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना अ गटात ठेवण्यात आले आहेत. तर ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंड या संघांचा समावेश आहे.
Women's T20 WC: ICC कडून T20 World Cup चे सुधारित वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी होणार भारत-पाकिस्तान सामना
Women's T20 WC Scheduled
Published On

महिला T२० विश्वचषक २०२४ लवकर सुरू होणार आहे. संयुक्त अरब अमिरात (UAE) मध्ये हा विश्वकप होणार सुरू होणार आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) बांगलादेशकडून स्पर्धेचे यजमानपद हिसकावून घेतल्यानंतर आयसीसीने सुधारित वेळापत्रक जाहीर केलंय. आता सर्व सामने दुबई आणि शारजाह येथे खेळवले जाणार आहेत.

महिला टी२० विश्वचषकात १० संघ सहभाग घेणार त्यांच्यामध्ये चुरशीच्या लढती होणार आहे. हे संघ दोन गटात विभागलेले आहेत. ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि श्रीलंका या संघांना अ गटात ठेवण्यात आले आहे. दरम्यान ब गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि स्कॉटलंड या संघांचा समावेश आहे. स्पर्धेपूर्वी २८ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत १० सराव सामने खेळवले जाणार आहेत.

या स्पर्धेत प्रत्येक संघ चार गट सामने खेळणार आहे. यात प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ १७ आणि १८ ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीत पोहोचतील. त्यानंतर २० ऑक्टोबरला दुबईत अंतिम सामना होणार आहे. सेमीफायनल आणि फायनलसाठीही राखीव दिवस ठेवण्यात आलाय. जर भारत उपांत्य फेरीत पोहोचला तर उपांत्य फेरी-१ मध्ये खेळेल. दुबई आणि शारजाहमध्ये एकूण २३ सामने खेळवले जाणार आहेत.

भारत आणि पाकिस्तानचा कधी होणार सामना

भारत आणि पाकिस्तानच्या संघाला एका ग्रुपमध्ये ठेवण्यात आलेय आहे. सहा ऑक्टोबरमध्ये भारतीय संघाशी पाकिस्तानचा सामना होणार आहे. हा सामना दुबईमध्ये होणार आहे. हा सामना दुपारी २ वाजल्यापासून होणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आगामी स्पर्धेसाठी अद्याप संघ जाहीर केलेला नाहीये. तर पााकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) फातिमा सना हिच्याकडे संघाची कमान सोपवलीय.

Women's T20 WC: ICC कडून T20 World Cup चे सुधारित वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी होणार भारत-पाकिस्तान सामना
India vs Pakistan, World Cup: भारत- पाकिस्तान सामन्यासाठी BCCI ची जोरदार तयारी! जाणून घ्या कुठे आणि कधी रंगणार सामना

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com