Ind vs Pak: भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ जेव्हा आमने सामने येतात तेव्हा चाहत्यांना हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळत असतो. दोन्ही संघ द्विपक्षीय मालिका खेळताना दिसून येत नाही.
हे दोन्ही संघ केवळ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये खेळताना दिसून येत असतात. त्यामुळे हा सामना पाहण्यासाठी दोन्ही देशातील चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.
आता लवकरच हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. कधी आणि कुठे रंगणार हा सामना? जाणून घ्या.
बीसीसीआयने या हाय व्हॉल्टेज सामन्यासाठी खास प्लॅनिंग केली आहे. इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, भारत आणि पाकिस्तान सामना जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाऊ शकतो.
कारण हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम आहे. या मैदानावर एक लाख प्रेक्षक एकाच वेळी सामना पाहू शकतात.
हा सामना पाहण्यासाठी भारत -पाकिस्तानसह दुसऱ्या देशातील प्रेक्षक देखील सामना पाहण्यासाठी हजेरी लावू शकतात.
आयपीएल नंतर होऊ शकते वेळापत्रकाची घोषणा..
बीसीसीआयने अजूनपर्यंत वेळापत्रकाची घोषणा केली नाहीये. अशी माहिती समोर येत आहे की, आयपीएल स्पर्धा झाल्यानंतर वेळापत्रकाची घोषणा केली जाऊ शकते. वेळापत्रक बनवण्याची जोरदार तयारी सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. आयपीएल २०२३ स्पर्धेचा अंतिम सामना हा २८ मे रोजी खेळवला जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार जर सर्व काही ठरलेल्या वेळापत्रकानुसार झालं तर, ५ ऑक्टोबरपासून वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होऊ शकते.
दरम्यान पाकिस्तानचा संघ वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात येणार की नाही याबाबत कुठलंही स्पष्टीकरण आलं नाहीये. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी आशिया चषक स्पर्धा खेळण्यासाठी भारतात जाणार नसल्याची घोषणा केली होती. त्यांनतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डने देखील वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात येणार नसल्याची धमकी दिली होती.
भारत पाकिस्तान हेड टू हेड रेकॉर्ड..
भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ १३२ वेळेस आमने सामने आले आहेत. दरम्यान भारतीय संघाला ५५ तर पाकिस्तान संघाला ७३ वेळेस विजय मिळवता आला आहे. यादरम्यान भारतीय संघाला ७३ तर पाकिस्तान संघाला ५५ वेळेस पराभवाचा सामना करावा लागणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.