IPL 2023 RR Vs GT: गुजरात घेणार का पराभवाचा बदला? जाणून घ्या कशी असेल RR vs GT सामन्यात दोन्ही संघांची प्लेइंग 11

IPL 2023 RR Vs GT Match Prediction: दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे.
IPL 2023 RR Vs GT: गुजरात घेणार का पराभवाचा बदला? जाणून घ्या कशी असेल RR vs GT सामन्यात दोन्ही संघांची प्लेइंग 11
Published On

IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेत आज दोन बलाढ्य संघ आमने सामने येणार आहेत. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात जोरदार लढत रंगणार आहे.राजस्थान रॉयल्स संघ मुंबई इंडियन्स संघाकडून पराभूत होऊन आला आहे.

तर गुजरातचा संघ दिल्ली कॅपिटल्स संघाकडून पराभूत होऊन आला आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे.

पॉइंट्स टेबलमध्ये राजस्थानचा संघ चौथ्या स्थानी.. (IPL 2023 Points Table)

राजस्थान रॉयल्स संघ आयपीएल २०२३ च्या गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे. या संघाने ९ पैकी ५ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर ४ सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

गेल्या ५ सामन्यांपैकी केवळ २ सामन्यांमध्ये राजस्थानला विजय मिळवता आला आहे. जर आज होणाऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने विजय मिळवला तर या संघाला दुसऱ्या स्थानी जाण्याची संधी असणार आहे.

गुजरात करणार प्लेऑफमध्ये प्रवेश?

गुजरात टायटन्स संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याच्या अगदी जवळ आहे. हा संघ १२ पॉइंट्ससह अव्वल स्थानी आहे. जर हा संघ जिंकला तर प्लेऑफमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. गुजरातने ९ पैकी ६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे.

तर केवळ ३ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. गुजरात संघातील फलंदाज आणि गोलंदाज चांगल्याच फॉर्ममध्ये आहेत. (Latest sports updates)

पिच रिपोर्ट (RR VS GT Pitch Report)

सवाई मानसिंग स्टेडियमची खेळपट्टी ही गोलंदाजांसाठी फायदेशीर आहे. या खेळपट्टीवर फलंदाजी करणारा संघ मोठी धावसंख्या उभारू शकत नाही. या मैदानावर लो स्कोरिंग सामने पाहायला मिळतात. तसेच नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणारा संघ विजयाचा प्रबळ दावेदार ठरू शकतो.

कसे असेल हवामान? (RR vs GT Weather Report)

या सामन्याच्या दिवशी वातावरण गरम असेल. सामन्यावेळी जयपुरचे तापमान ३५ डिग्री सेल्सिअस इतके असेल.

राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals): संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), जोस बटलर, यशस्वी जयस्वाल, देवदत्त पडिक्कल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ध्रुव जुरेल, ट्रेंट बोल्ट, युझवेंद्र चहल, संदीप शर्मा आणि जेसन होल्डर.

गुजरात टायटन्स (Gujarat Titans) : हार्दिक पंड्या (कर्णधार), रिद्धिमान साहा (यष्टिरक्षक), अभिनव मनोहर, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, जोशुआ

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com