ben stokes twitter
क्रीडा

Ben Stokes Statement: रोहितमुळेच हा विजय शक्य झाला? इंग्लंडच्या विजयानंतर काय म्हणाला बेन स्टोक्स?

IND vs ENG 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान या सामन्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

Ben Stokes Statement:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा सामना जिंकल्यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने मोठं वक्तव्य केलं आहे.

हा सामना झाल्यानंतर बोलताना बेन स्टोक्स म्हणाला की, ' जेव्हापासून मी संघाची जबाबदारी सांभाळली आहे तेव्हापासून अनेक असे आनंदाचे क्षण आले आहेत. आम्ही अनेक सामने जिंकले आहेत. तर काही सामने अटीतटीचे झाले आहेत. मात्र आम्ही जिथे आहोत, ज्यांच्याविरुद्ध खेळतोय. हा विजय आमच्यासाठी १०० टक्के मोठा विजय आहे. कर्णधार म्हणून मी पहिल्यांदाच भारतात आलो आहे.'

इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने पुढे बोलताना म्हटले की, ' मी चांगला ऑब्जर्वर आहे. मला पहिल्या डावातून खूप काही शिकायला मिळालं. मी पाहिलं की, रोहित शर्मा फिरकी गोलंदाजांचा वापर कशा पद्धतीने करतोय. तो कुठल्या गोलंदाजासाठी कसं क्षेत्ररक्षण सजावतोय. सर्वांसाठीच हा सामना रोमांचक होता. टॉम हार्टलेने पदार्पणात ९ गडी बाद केले. ओली पोप दुखापतीतून सावरल्यानंतर कमबॅक करतोय.' (Latest sports updates)

' टॉम पहिल्यांदाच संघात आला आहे. मी त्याला मोठ्या स्पेल देण्याच्या तयारीत होतो. कारण मला माहीत होतं काहीही झालं तरी मला परत त्याच्याकडेच जायचं आहे. आम्ही त्यांना पूर्णपणे बॅक करतो ज्यांना आम्ही खेळण्यासाठी निवडलं आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मला उपमहाद्वीपात अनेक सामने खेळण्याची संधी मिळाली.' असं बेन स्टोक्स म्हणाला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

New Marathi Movie: 'वाढलेलं वय अन् लग्नाची जुळवणी', सुबोध भावे अन् तेजश्रीनं घातला घाट; ट्रेलरने उत्सुकता वाढवली

MNS Manifesto: आम्ही हे करु! गडकिल्ले, रोजगार ते महिलांची सुरक्षा, मनसेचा जाहीरनामा प्रसिद्ध!

Diabetes symptoms: योनीमार्गात जखम किंवा संसर्ग असल्यास असू शकतं मधुमेहाचं लक्षण!

Sanjay Raut News : गद्दारासाठी पक्षाचं अधःपतन केल्याने त्यांना वैफल्य आलंय; संजय राऊतांचा फडणवीसांवर प्रतिहल्ला

Journey Marathi Movie : अनपेक्षित प्रवासाची कथा उलगडणाऱ्या 'जर्नी' चित्रपटाचा थरार, प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

SCROLL FOR NEXT