Mohsin Naqvi  x
Sports

BCCI चा मोहसिन नकवीला दणका, आशिया कप ट्रॉफी न दिल्याने ACCचं संचालकपद जाणार?

Mohsin Naqvi : आशिया कप २०२५ मध्ये मोहसिन नकवी यांनी ट्रॉफीवरुन वाद घातला होता. ते ट्रॉफी घेऊन निघून गेले होते. या कृत्यांमुळे त्यांच्या विरुद्ध कारवाई होणार असल्याचे म्हटले जात आहे.

Yash Shirke

  • मोहसिन नकवींनी आशिया कप २०२५ ट्रॉफी घेऊन एसीसी कार्यालयात ठेवली.

  • बीसीसीआयने ट्रॉफी ड्रामावर आक्षेप नोंदवला; कारवाईचा इशारा दिला.

  • पुढच्या महिन्यात आयसीसी बैठकीत हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे.

Asia Cup 2025 ची ट्रॉफी दुबईतील एसीसी मुख्यालयात ठेवण्यात आली आहे. एसीसीचे प्रमुख मोहसिन नकवी यांनी त्यांच्या परवानगीशिवाय ट्रॉफी भारताला देऊ नये असा फर्मान काढला आहे. आशिया कप जिंकल्यानंतर टीम इंडियाने ट्रॉफी नकवी यांच्या हातून घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर ट्रॉफी नकवी यांनी सोबत घेतली आणि एसीसी कार्यालयात ठेवली. आशिया कप २०२५ च्या अंतिम सामन्यापासून ट्रॉफी ड्रामा सुरु आहे.

मोहसिन नकवी यांच्या जवळच्या एका सूत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, आशिया कप संपल्यापासून आजपर्यंत ही ट्रॉफी दुबईतील एसीसीच्या कार्यालयातच आहे. माझ्या परवानगीशिवाय किंवा वैयक्तिक उपस्थितीशिवाय ती कोणालाही देऊ नये अशा सूचना नकवी यांनी दिल्या आहेत. फक्त तेच (मोहसिन नकवी) वैयक्तिकरित्या ट्रॉफी टीम इंडिया किंवा बीसीसीआयकडे सुपूर्त करतील.

आशिया कप २०२५ मधील भारत-पाकिस्तान सामने हे तणावपूर्ण स्थितीमध्ये खेळले गेले. पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंदूर यामुळे दोन्ही देशातील संबंध ताणले होते. त्यात भारत विरुद्ध पाकिस्तान सामने खेळले जाऊ नये अशीही मागणी सुरु होती. यामुळे संपूर्ण स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंनी हस्तांदोलन केले नाही.

मोहसिन नकवी यांनी केलेल्या ट्रॉफी ड्रामावर बीसीसीआयने आक्षेप घेतला आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या आयसीसीच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. नकवी यांना दोषी ठरवण्यासाठी आणि एसीसी संचालकपदावरुन काढून टाकण्यासाठी त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाऊ शकते असे म्हटले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात होणार सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीचा अंतिम सामना

पुणे-कोल्हापूर महामार्ग कधी पूर्ण करणार? सुप्रिया सुळेंचा सवाल, नितीन गडकरींनी तारीखच सांगितली|VIDEO

Chinese Bhel Recipe : भेळेला द्या चायनीजचा तडका, वीकेंडची संध्याकाळ होईल चटपटीत

Bigg Boss 19: बिग बॉस १९ मध्ये सर्वाधिक मानधन घेणारा स्पर्धक कोण? टॉप ५ स्पर्धकांची कमाई जाणून घ्या

सप्तशृंगी देवीच्या भाविकांवर काळाचा घाला; भीषण अपघातात पाच जण दगावल्याची शक्यता

SCROLL FOR NEXT