Kolhapur : बेल्ट, बॅट, दांडक्याने विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण हॉस्टेलमध्ये भयंकर प्रकार, मारहाणीचे Video समोर

Kolhapur Hostel Beating : कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे येथील हॉस्टेलमध्ये मारहाणीची घटना घडली आहे. काही मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांना लहान वर्गातील विद्यार्थ्यांना मारहाण केली.
Kolhapur Hostel News
Kolhapur Hostel Newsx
Published On
Summary
  • कोल्हापूरमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण

  • हॉस्टेलमध्ये घडला मारहाणीचा प्रकार

  • घटनेचे अनेक व्हिडीओ व्हायरल

रणजित माजगावकर, साम टीव्ही, प्रतिनिधी

Kolhapur Hostel Beating Video : कोल्हापूर जिल्ह्यातील तळसंदे येथे हॉस्टेलमध्ये काही विद्यार्थ्यांना मारहाण करण्यात आली. तळसंदेतील एका हॉस्टेलमध्ये हा मारहाणीची घटना घडली. विद्यार्थ्यांना मारहाण होत असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जखमी विद्यार्थ्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील तळसंदे येथील एका हॉस्टेलमध्ये काही विद्यार्थी लहान वर्गातील विद्यार्थ्यांना मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हातामध्ये बेल्ट, बॅट, दांडके घेऊन या विद्यार्थ्याला मारहाण होते. मारहाणीत सिद्धीविनायक सनी मोहिते (वय १६, रा. उचगाव) जखमी झाला. काल (९ ऑक्टोबर) पहाटे पाचच्या सुमारास हा मारहाणीचा प्रकार घडला.

Kolhapur Hostel News
Maharashtra Politics : शिंदे गटाला मोठा झटका, मोठ्या नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

जखमीला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. याची नोंद सीपीआर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. या प्रकरणानंतर पालक वर्गातून विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचे अनेक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहेत. होस्टेल प्रशासन अथवा पोलीस प्रशासनाकडून या संदर्भात अधिकृतरित्या कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही.

Kolhapur Hostel News
Dombivli : डोंबिवलीत मोठा राडा! ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला मारहाण, कारही फोडली; Video

ही गोष्ट महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लावून धरली आहे. मनसेने मागच्या महिन्यापासूनच कोल्हापूर जिल्ह्यातील अशा अनधिकृत हॉस्टेल्स विरोधात आवाज उठवला आहे. तळसंदे येथील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर या संदर्भात गंभीर दखल घेत जिल्हा प्रशासन आणि शाळा प्रशासन यांना जाब विचारुन तीव्र आंदोलन छेडणार असल्याचे मनसेने म्हटले आहे.

Kolhapur Hostel News
Politics : निवडणुकीपूर्वी भाजपला धक्का? २ मित्रपक्ष साथ सोडण्याच्या तयारीत, चर्चांना उधाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com