Politics : निवडणुकीपूर्वी माजी मुख्यमंत्र्यांना मोठा झटका, बड्या नेत्याने दिला तडकाफडकी राजीनामा

Political News : विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षातील आमदाराने तडकाफडकी राजीनामा दिला आहे.
Politics
Politicsx
Published On
Summary
  • माजी मुख्यमंत्र्यांना मोठा झटका

  • आमदाराने दिला तडकाफडकी राजीनामा

  • राजीनाम्याची सोशल मीडियावर केली घोषणा

Political News : विधानसभा निवडणुकीपूर्वी बिहारमध्ये राजकीय उलथापालथ होत असल्याचे पाहायला मिळत आहे. जेडीयू-राजद अशा पक्षांमधून इनकमिंग आणि आउटगोईंग सुरु आहे. निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक असल्याने सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. अशातच राजद म्हणजेच राष्ट्रीय जनता दलाचे आमदार चेतन आनंद यांनी तडकाफडकी राजीनामा दिला आहे.

शिवहारचे आमदार चेतन आनंद यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्षांना राजीनामा पत्र पाठवले आहे. राष्ट्रीय जनता दलातून बाहेर पडत ते जेडीयू म्हणजे जनता दल युनायटेडकडून विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्या राजीनाम्यामुळे राजदला आणि माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Politics
BMC Election : बीएमसीत आमचे वाघ... जैन मुनींकडून नव्या पक्षाची स्थापना, निवडणुकीत कुणाला झटका बसणार?

आमदार चेतन आनंद यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत राजीनामा दिल्याची घोषणा केली. चेतन आनंद हे शिवहारचे माजी खासदार आनंद मोहन आणि विद्यमान खासदार लवली आनंद यांचे सुपुत्र आहेत. २०२० मध्ये महाआघाडी समर्थित राजदकडून विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यांनी जेडीयूचे उमेदवार मोहम्मद शरफुद्दीन यांचा मोठ्या फरकाने पराभव केला होता.

Politics
Nilesh Ghaiwal : मोठी बातमी! निलेश घायवळ भारतात परत येणार, वकीलाचा दावा; पाहा Video

चेतन आनंद यांचा जेडीयूमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. राजदने त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यासाठी अर्ज दिला होता, पण त्यावर काहीही कारवाई झाली नाही. आता विधानसभा निवडणुका जवळ आल्याने त्यांनी स्वत:हून सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आता आता जेडीयूच्या तिकिटावर शिवहार मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहे, असे त्यांनी सांगितले. शिवहारमधून तिकीट निश्चित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Politics
Devendra Fadnavis : घायवळला गृहराज्यमंत्र्यांनी शस्त्र परवाना दिला का? मुख्यमंत्री फडणवीसांनी केला खुलासा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com