Giorgia Meloni : इटलीमध्ये बुरखा आणि नकाबवर बंदी? ३ लाखांचा बसणार दंड, मेलोनी यांचा मोठा निर्णय

Burqa Ban in Italy Giorgia Meloni : इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी इटलीत बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्याच्या तयारीला सुरूवात केली आहे. त्यांच्या या निर्णयाची चर्चा होत आहे.
Summary

Burqa Ban in Italy : जॉर्जिया मेलोनी यांच्यासंदर्भातच आणखी एक बातमी आहे. जॉर्जिया मेलोनी यांनी इटलीमध्ये बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्याची तयारी सुरू केलीय. सत्ताधारी पक्षाने म्हणजे ब्रदर्स ऑफ इटली या पक्षानं संसदेत एक नवीन विधेयक सादर केलाय.. ज्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी बुरखा आणि नकाब घालण्यावर बंदी घालण्याचा प्रस्ताव आहे. इस्लामिक सांस्कृतिक अलिप्तता आणि धार्मिक कट्टरता रोखण्यासाठी हा कायदा आणला जात असल्याचं मेलोनी यांच्या पक्षाचं म्हणणं आहे. प्रस्तावित कायद्यानुसार, कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी म्हणजेच शाळा, विद्यापीठं, कार्यालयं, दुकानं आणि सरकारी इमारतीत चेहरा झाकणाऱ्या सर्व कपड्यांवर पूर्णपणे बंदी घालण्यात येणार आहे.. तर कायद्याचं उल्लंघन केल्यास 3 लाख रुपये दंड भरावा लागणार आहे...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com