jasprit bumrah yandex
क्रीडा

Jasprit Bumrah वर अन्याय? BCCI ने संघात तर घेतलं, पण...

India vs Bangladesh 1st Test: भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान जसप्रीत बुमराहवर अन्याय झाल्याचं पाहायला मिळालं आहे.

Ankush Dhavre

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. चेन्ननईमध्ये होणाऱ्या या सामन्यासाठी बीसीसीआयने १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.

या मालिकेतही रोहित शर्मा भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. मात्र भारतीय संघाचा उपकर्णधार कोण असणार? हे बीसीसीआयने स्पष्ट केलेलं नाही. यापूर्वी रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार तर जसप्रीत बुमराह भारतीय संघाचा उपकर्णधार होता. मात्र यावेळी बीसीसीआयने उपकर्णधार कोण असणार हे स्पष्ट केलेलं नाही.

भारतीय संघाची घोषणा होताच अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. त्यापैकीच एक प्रश्न म्हणजे बीसीसीआयला जसप्रीत बुमराह उपकर्णधार म्हणून नकोय का? जसप्रीत बुमराह हा भारतीय संघातील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आलं होतं. मात्र बीसीसीआय आता हे पद काढून घेण्याच्या विचारात असल्याचं दिसून येत आहे.

बुमराहला उप कर्णधारपदावरुन काढलंय का? आणि काढलंय तर का? हे जाणून घेणं महत्वाचं आहे. बीसीसीआय जसप्रीत बुमराहचं वर्कलोड मॅनेज करण्याच्या प्रयत्नात आहे. त्यामुळे त्यांनी उप कर्णधारपदाचा भार काढून टाकला असावा. तत

बुमराहनंतर कोण होणार भारतीय कसोटी संघाचा उप कर्णधार?

भारतीय संघाला इथून पुढे महत्वाच्या मालिका खेळायच्या आहेत. बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका झाल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध २ हात करताना दिसेल. त्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी उप कर्णधाराचं नाव जाहीर करण्यात आलेलं नाही. मात्र न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेपूर्वी उपकर्णधाराचं नाव जाहीर केलं जाऊ शकतं.

बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सरफराज खान, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टिरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि यश दयाल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: पुण्यातल्या नवले ब्रिजवर दोन चारचाकी वाहनांचा अपघात; ३ जण गंभीर जखमी

Bullet Train Bridge Collapsed: बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निर्माणाधीन पूल कोसळला; अनेक कामगार मलब्याखाली दबले

Assembly Election: मनोज जरांगे पाटलांनी रयतेतल्या मराठ्यांचा बळी दिला: प्रकाश आंबेडकर

Virat Kohli Birthday : 'बापमाणूस' विराट कोहली! पत्नी अनुष्काचा प्रेमवर्षाव, नवऱ्यासाठी खास पोस्ट

Azaad Teaser Released : अजय देवगणचा 'आझाद' येतोय; मामा-भाचा एकाच सिनेमात, अॅक्शनचा धमाका, टीझर पाहाच!

SCROLL FOR NEXT