baroda twitter
Sports

Baroda vs Sikkim: 37 षटकार,18 चौकार; हार्दिक पंड्याच्या टीमने उभारला टी-२० तील सर्वात मोठा स्कोअर

Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत बडोदा संघाने कहर केला आहे.

Ankush Dhavre

Syed Mushtaq Ali Trophy, Baroda vs Sikkim: वनडे क्रिकेटमध्ये आधी ३०० धावा करणंही कठीण होतं. २५० च्या पुढे धावसंख्या गेली, तर गोलंदाज रुबाबात मैदानात उतरायचे. मात्र आता टी-२० क्रिकेटमध्येही ३०० धावा होऊ लागल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी भारतीय संघाने हल्लाबोल करत ३०० धावांच्या जवळपास जाण्याचा कारनामा केला होता. मात्र आता बडोदा संघाने ३०० धावांचा पल्ला गाठला आहे. यासह टी -२० क्रिकेटमध्ये इतिहास रचला आहे. यापूर्वी कुठल्याही संघाला टी-२० क्रिकेटमध्ये ३०० धावांचा पल्ला गाठता आला नव्हता.

बडोदाने रचला इतिहास

भारतात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेत गुरुवारी झालेल्या सामन्यात बडोदा आणि सिक्कीम हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यासाठी मैदानात आलेल्या सिक्कीम संघाने विचारही केला नसेल की, त्यांच्यासोबत काय होणार आहे. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या अभिमन्यू सिंग आणि शाश्वत रावतने तुफान फटकेबाजी केली.

या संघाला सलामी जोडीने ९२ धावांची वादळी सुरुवात करुन दिली. बाद होणाऱ्या अभिमन्यूने १७ चेंडूंचा सामना करत ५३ धावांची खेळी केली. तर शाश्वत रावतने १६ चेंडूंचा सामना करत ४३ धावांची खेळी केली.

त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या भानू पुनियाने तर कहरच केला. त्याने ५१ चेंडूंचा सामना करत १३४ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने १५ षटकार आणि ५ चौकार मारले.

या डावात फलंदाजी करताना बडोदाने २० षटकअखेर ३४९ धावांचा डोंगर उभारला. टी-२० क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच कुठल्याही संघाने इतकी मोठी धावसंख्या उभारली.

या डावात बडोदाच्या फलंदाजांनी सर्वाधिक ३७ षटकार मारले. हे टी-२० क्रिकेटमधील सामन्यात कुठल्याही संघाने मारलेले सर्वाधिक षटकार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात, बोगद्यामध्ये ७-८ वाहनांची एकमेकांना जोरदार धडक

Saiyaara Vs Ye re ye re paisa 3: 'सैयारा'मुळे मराठी चित्रपटाला शोच मिळेना; मनसे नेत्यानं दिला कडक इशारा

Politics : चिराग भडकले, नितीश कुमार सरकारवर तुटून पडले; निवडणुकीआधीच बिहारचं राजकारण तापलं

Heart Attack Tips : सतर्क राहा! हार्ट अटॅक आल्यावर घरात एकटे असताना काय करावं, हे जाणून घ्या

Maharashtra Live News Update: बीडमध्ये वाल्मीक कराडचे बॅनर, बॅनर लावणारे अजित पवारांच्या जवळचे

SCROLL FOR NEXT