
India vs Australia: हा आठवडा भारतीय पुरुष आणि महिला संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. दोन्ही संघ ऑस्ट्रेलियाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारतीय महिला संघ वनडे मलिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
तर दुसरीकडे भारतीय पुरुष संघ कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. शुक्रवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. तर महिलांचा पाहिला वनडे सामना आजपासून सुरू होणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेतील पहिला वनडे सामना आजपासून ब्रिस्बेनमध्ये रंगणार आहे. तर मालिकेतील दुसरा वनडे सामना रविवारी खेळला जाणार आहे. हा सामना देखील ब्रिस्बेनच्या मैदानात रंगणार आहे. तर मालिकेतील शेवटचा वनडे सामना ११ डिसेंबरला पर्थमध्ये रंगणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना गुरुवारपासून रंगणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९:५० ला सुरू होईल. हा सामना स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहे.
यासह हे सामने तुम्ही डिस्नी प्लस हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता. तर मालिकेतील दुसरा सामना सकाळी ५:१५ ला सुरू होईल. तर मालिकेतील तिसरा सामना ९:५० ला सुरू होईल.
या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ :
भारत: प्रिया पुनिया, स्मृति मंधाना, जेमिमा रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर (कर्णधार), दिप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टिरक्षक), अरुंधति रेड्डी, राधा यादव, प्रिया मिश्रा, रेणुका ठाकुर सिंग, तितास साधु, साइमा ठाकोर, मिन्नू मणि, तेजल हसब्निस, उमा छेत्री, हरलीन देओल.
ऑस्ट्रेलिया: बेथ मूनी (यष्टिरक्षक), जॉर्जिया वोल, एलिस पेरी, ताहलिया मैकग्राथ (कर्णधार), फोएबे लिचफील्ड, एशले गार्डनर, एनाबेल सदरलेंड, अलाना किंग, सोफी मोलिनक्स, मेगन शुट्ट, डार्सी ब्राउन, जॉर्जिया वेयरहॅम, किम गर्थ
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.