
भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. पहिला सामना भारताने २९५ धावांनी आपल्या नावावर केला.
यासह भारतीय संघाने कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. मालिकेतील दुसरा सामना अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार असून हा डे नाईट कसोटी सामना असणार आहे. हा सामना गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे.
या सामन्याला ६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत दोन्ही संघांमध्ये एकतर्फी लढत पाहायला मिळाली होती. पहिल्या डावात दोन्ही संघांचे डाव गडगडले होते. मात्र दुसऱ्या डावात भारतीय संघाने दमदार कमबॅक केलं आणि ऑस्ट्रेलियावर २९५ धावांनी विजय मिळवला.
मालिकेतील दुसरा सामना हा डे-नाईट कसोटी सामना असणार आहे. डे-नाईट कसोटीत ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. तर भारतीय संघासाठी हा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे.
कारण भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिनयशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी ५ पैकी ४ सामने कुठल्याही परिस्थितीत जिंकायचे आहेत.
एकीकडे भारतीय संघ हा सामना जिंकून २-० ने भक्कम आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचा संघ कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी सामना म्हटलं, तर पहाटे उठून टीव्हीसमोर बसावं लागतं. मात्र मालिकेतील दुसरा कसोटी सामना हा डे- नाईट कसोटी सामना असणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियात हा सामना दुपारी २:३० वाजता सुरु होईल.
तर भारतीय वेळेनुसार हा सामना सकाळी ९:४९ वाजता सुरु होणार आहे. त्यामुळे आता हा सामना पाहण्यासाठी तुम्हाला पहाटे उठण्याचे कष्ट घ्यावे लागणार नाहीत.
भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, अभिमन्यू ईश्वरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत (यष्टीरक्षक), सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, आर जडेजा, मोहम्मद. सिराज, आकाश दीप, प्रसिद्ध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.