Vashi Toll Accident : वाशी टोल नाक्यावर भंयकर अपघात, नवरा-बायकोचा जागीच मृत्यू, नेमकं काय घडलं?

Panvel Sion Highway crash : पनवेल-सायन महामार्गावर भयंकर अपघात झालाय. वाशी टोल नाक्यावर डंपरने दुचाकाली धडक दिल्यामुळे दाम्पत्याला प्राण गमवावे लागलेत.
Road Accident on Panvel–Sion Highway
Vashi Toll Plaza accident: Dumper crushes Roshan and Jancy Lobo, police detain driverSaam TV Marathi News
Published On
Summary
  • वाशी टोल नाक्यावर भरधाव डंपरने दुचाकीला जोरात धडक दिली

  • रोशन व जॅन्सी लोबो दाम्पत्याचा जागीच मृत्यू

  • लोबो कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला

  • वाशी पोलिसांनी डंपर चालकाला ठोकल्या बेड्या

Road Accident on Panvel–Sion Highway : डंपरच्या चाकाखाली आल्यामुळे दाम्पत्यांचा जागीच मृत्यू झाला. वाशी टोल नाक्यावर हा भयंकर अपघात घडला. मुंब्रामधून नवी मुंबईमार्गे दुचाकीवरून दाम्पत्य साकीनाकाला निघाले होते. त्यावेळी भयंकर अपघात घडला. दाम्पत्य डंपरच्या चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू झाला. वाशी टोलनाक्याजवळ हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच वाशी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला. चालकाला घटनास्थळावरून बेड्या ठोकल्या आहेत. अपघातात मृत्यू झालेल्या दाम्पत्याचे नाव रोशन लोबो (३९) आणि जॅन्सी रोशन लोबो (३२) असे आहे. रोशन आणि जॅन्सी यांच्या निधनामुळे लोबो कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.

रोशन आणि जॅन्सी लोबो हे दाम्पत्य साकीनाकामधील ९० फूट रोडवरील महात्मा फुले नगरमध्ये राहत होते. ते गुरुवारी दुपारी दुचाकीवरून मुंब्र्यात कामानिमित्त गेले होते. काम आटोपल्यानंतर ते रात्री नवी मुंबई मार्गे घराकडे परत येत होते. त्यावेळी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास वाशी टोल नाक्यावजवळ ते आले होते. त्यावेळी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव डम्परची दुचाकीला जोरात धडक बसली.

Road Accident on Panvel–Sion Highway
तब्बल २ कोटी मोबाइल नंबर अचनाक बंद, सरकारने का घेतला निर्णय, वाचा सविस्तर

डंपरच्या धडकेमुळे रोशन लोबो यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी चाकाखाली आली. डंपरच्या पाठीमागील चाकाखाली रोशन आणि जॅन्सी आले अन् चिरडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर वाशी टोल नाक्याजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी डंपर चालकाला बेड्या ठोकल्या. वाहतूक तात्काळ सुरळीत केले. पोलिसांनी लोबो दाम्पत्याचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी रूग्णालयात पाठवले आहेत.

Road Accident on Panvel–Sion Highway
Three Language Policy : मोठी बातमी! अखेर त्रिभाषा धोरणासाठी समिती स्थापन, ७ जणांचा समावेश

वाशी पोलिसांनी डंपर चालकाला घटनास्थळावरून बेड्या ठोकल्या. आरोपी चालकाचे नाव रेवतलाल महातो असे आहे. निष्काळजीपणे डंपर चालवल्या प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. महातो याची कसून चौकशी करण्यात येत आहे. वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शशिकांत चांदेकर यांच्या नेतृत्वात हे प्रकरण तपास करण्यात येत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com