kagiso rabada twitter
क्रीडा

Kagiso Rabada: कगिसो रबाडाने इतिहास रचला! असा रेकॉर्ड करणारा ठरला पहिलाच गोलंदाज

Kagiso Rabada Record, BAN vs SA: दक्षिण आफ्रिकेचा स्टार गोलंदाज कगिसो रबाडाने कसोटी क्रिकेटमधील एक मोठा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

Ankush Dhavre

Kagiso Rabada News In Marathi: दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. भारताकडून २-० ने पराभूत होऊन आलेला बांगलादेशचा संघ आता २ कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेचा सामना करताना दिसणार आहे.

या मालिकेतील पहिला कसोटी सामना मीरपूरमध्ये सुरु आहे. या सामन्यात बांगलादेशचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. मात्र दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासूनच हल्लाबोल करत बांगलादेशच्या प्रमुख फलंदाजांना माघारी धाडलं आहे.

कगिसो रबाडा सध्या दक्षिण आफ्रिकेची स्पीड गन म्हणून ओळखला जातो. जेव्हा जेव्हा संघाला विकेटची गरज असते, तेव्हा रबाडा संघाला विकेट मिळवून देतो. आता बांगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात त्याने ऐतिहासिक कारनामा केला आहे. आपल्या ६५ व्या सामन्यात त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ३०० विकेट घेण्याचा कारनामा करुन दाखवला आहे.

तो कमी चेंडूत सर्वात जलद ३०० विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. आतापर्यंत हा रेकॉर्ड वकार युनुस यांच्या नावावर होता. मात्र कगिसो रबाडाने हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. वकार युनुसबद्दल बोलायचं झालं, तर त्यांनी १२६०५ चेंडू फेकून ३०० फलंदाजांना पॅव्हेलियनची वाट दाखवली होती.

तर रबाडाने त्यांना बरंच मागे सोडत ११८१७ चेंडूत हा कारनामा करुन दाखवला आहे. तर यादीत तिसऱ्या स्थानी असलेल्या एलन डोनाल्डने १३६७२ चेंडूत हा कारनामा करुन दाखवला होता.

कगिसो रबाडा हा दक्षिण आफ्रिका संघातील प्रमुख गोलंदाज आहे. त्याला २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिका संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याने भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यातून पदार्पण केलं होतं.

रबाडा येण्याआधी डेल स्टेन हा संघातील प्रमुख गोलंदाज होता. मात्र स्टेननंतर ही जबाबदारी रबाडाने हाती घेतली. त्याने दक्षिण आफ्रिकेत आणि दक्षिण आफ्रिकेच्या बाहेर खेळतानाही शानदार गोलंदाजी केली. मुख्य बाब म्हणजे तो २९ वर्षांचा आहे. त्यामुळे त्याच्याकडे ५०० पेक्षाही अधिक विकेट्स घेण्याची संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

हनिमूनला जायचा विचार करताय का? भारतातील 'ही' ५ ठिकाणे आहेत प्रसिद्ध

Maharashtra News Live Updates: कार्तिकी यात्रेत विठ्ठल चरणी साडेतीन कोटींचे दान

लठ्ठपणामुळे मधुमेह होतो का? या दोघांमधील संबंध समजून घ्या...

Narayan Rane : महायुती आणि उद्धव ठाकरेंचे किती उमेदवार निवडून येतील? नारायण राणेंनी थेट आकडाच सांगितला

Diljit Dosanjh: दारूबंदी करा मग गाण्यांवर बंदी घाला, दिलजीत दोसांजचं सरकारच्या नोटिशीला उत्तर, काय आहे प्रकरण?

SCROLL FOR NEXT