Manasvi Choudhary
लांब केस आणि त्यावर गजरा माळणे हे महिलांच्या सौंदर्याचे खास समीकरण आहे. लांब केसांसाठी तुम्ही अनेक नवनवीन हेअरस्टाईलमध्ये गजरा माळू शकता.
केसांमध्ये गजरा माळण्याची जुनी पद्धत आहे. भारतीय संस्कृतीत फार पूर्वीपासून महिला केसांमध्ये गजरा माळतात.
केसांची एक उंच पोनीटेल बांधून घ्या त्यावर तुम्ही गोलाकार शेपमध्ये गजरा माळू शकता हा एक युनिक लूक दिसेल.
ज्यांना केस मोकळे ठेवायला आवडत नाहीत, त्यांच्यासाठी मानेपाशी केसांचा एक घट्ट आंबाडा बांधून त्यावर आंबाड्याच्या भोवती गजरा पूर्णपणे गोल गुंडाळा.
साईड बन विथ ड्रॉपिंग गजरा स्टाईलमध्ये डोक्याच्या एका बाजूला आंबाडा बांधा. यामध्ये गजऱ्याचे एक टोक आंबाड्यात अडकवून दुसरे टोक खांद्यावर मोकळे सोडा.
अर्धचंद्र किंवा साईड गजरा स्टाईलमध्ये अंबाडा बांधल्यावर गजरा पूर्ण गोल न लावता फक्त अंबाड्याच्या एका बाजून लावा.
ज्यांचे केस लांब आहेत त्यांनी वेणी घालून त्यावर गजरा गुंडाळायचा आहे. वेणीच्या सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत गुंडाळा.