Australian batsman marnus labuschagne praised indian captain rohit sharma ahead of india vs australia world cup 2023 match Saam tv news
Sports

World Cup 2023: ऑस्ट्रेलिया संघाला कोणत्या भारतीय फलंदाजाची भीती वाटते? लाबुशेनने सांगितलं नाव

Marnus Labuschagne Statement: मार्नस लाबुशेनने भारतीय फलंदाजाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

Ankush Dhavre

World Cup 2023:

भारतीय संघाला वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळायचा आहे. या सामन्यापूर्वी आनंदाची बाब अशी की, भारतीय संघातील सर्वच फलंदाज फॉर्ममध्ये परतले आहेत. कर्णधार रोहित शर्मा देखील जोरदार फॉर्ममध्ये असल्याचं दिसून आलं आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात रोहित शर्मा महत्वाची भूमिका बजावू शकतो. दरम्यान या सामन्यापूर्वी मार्नस लाबुशेनन रोहित शर्माबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे.

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मार्नस लाबुशेनने असं म्हटलं की, ' रोहित शर्मा असा फलंदाज आहे जो कुठलीही जोखीम न घेता सहज धावा कुटतो. एकदा तो फॉर्ममध्ये परतला तर त्याला धावा करण्यापासून रोखणं कठीण होऊन जाईल.' नुकताच भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने २-१ ने विजय मिळवला आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ५ गडी राखून विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ९९ धावांनी विजय मिळवला होता. मात्र तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता.

या दोन्ही सामन्यांमध्ये रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली होती. तर तिसऱ्या सामन्यात रोहित शर्माने कमबॅक केलं होतं. मात्र तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाला ६६ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात रोहित शर्माने ५७ चेंडूंचा सामना करत ८१ धावांची खेळी केली. (Latest sports updates)

चेन्नईत रंगणार सामना..

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील पहिला सामना ५ ऑक्टोबर रोजी इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. तर भारतीय संघाचा पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. हा सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Farali Misal Recipe : झणझणीत फराळी मिसळ, उपवासाला एकदा करून तर बघा

Rain Alert : वाशिम जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा; अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस

Maharashtra Live News Update : बीडमध्ये क्लासेसमधील मुलींचे लैंगिक छळ प्रकरण; दुसरा गुन्हा दाखल

Harbour Line : हार्बर मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत; रविवारच्या दिवशी प्रवाशांचे मेगा हाल

Ashadh Wari: विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल" जयघोषात पुण्याचे प्रतिपंढरपूर भक्तिरसात न्हालं|VIDEO

SCROLL FOR NEXT