Asian Games 2023: टीम इंडियाने पाकिस्तानला लोळवलं! स्क्वॅशमध्ये पटकावलं गोल्डमेडल

India Beat Pakistan In Squash: भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानवर विजय मिळवला आहे.
asian games 2023 india won gold medal in squash by beating pakistan in final match
asian games 2023 india won gold medal in squash by beating pakistan in final match Twitter
Published On

Asian Games 2023:

क्रिकेट असो किंवा स्क्वॅश,समोर पाकिस्तान असेल तर विजय हा भारताचाच होतो. चीनमध्ये सध्या आशियाई क्रीडा २०२३ स्पर्धेचा थरार सुरू आहे.

या स्पर्धेतील स्क्वॅश इव्हेंटच्या सुवर्णपदकाच्या लढतीसाठी भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने सामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानला धुळ चारत सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे.

अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाने सुरूवात करावी लागली. पाकिस्तानच्या नासिर इकहबालने भारताच्या महेश मनगांवरवर विजय मिळवला. १-० ने आघाडीवर असलेल्या पाकिस्तानला सौरव घोषालने जबरदस्त धक्का दिला.

यासह भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ १-१ च्या बरोबरीला आले होते. तिसऱ्या लढतीत अभय सिंगने विजय मिळवत भारताला सुवर्णपदक जिंकून दिला. (Latest sports updates)

asian games 2023 india won gold medal in squash by beating pakistan in final match
Asian Games 2023: कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा! स्वप्निल कुसाळेला सुवर्णपदक

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या पदकांच्या यादीत भर पडली आहे. भारताची पदकांची संख्या आता ३६ वर जाऊन पोहोचली आहे. ज्यात १० सुवर्णपदक, १३ रौप्यपदक आणि १३ कांस्यपदकांचा समावेश आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसलेच्या जोडीने मिक्स डबल्स टेनिसमध्ये भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com