चीनमध्ये सुरू असलेल्या १९ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी घवघवीत यश मिळवलं आहे.
स्पर्धेतील सहाव्या दिवशी महिलांच्या गोळाफेक इव्हेंटमध्ये भारताला कांस्यपदक मिळालं आहे. भारतीय गोळाफेकपटू किरण बालियानने १७.३६ मीटर लांब गोळा फेकून भारताला कांस्यपदक मिळवून दिलं आहे.
मेरठमध्ये राहणाऱ्या किरण बालियानने (Kiran Baliyan) पदक जिंकून ट्रॅक अँड फिल्ड इव्हेंटमध्ये आशिया चषक २०२३ स्पर्धेत भारताला पहिलं पदक जिंकून दिलं आहे.
हे पदक जिंकत किरण बालियानने इतिहास घडवला आहे. कारण तब्बल ७२ वर्षांनंतर पहिल्यांदाच कुठल्याही भारतीय महिला खेळाडूने गोळाफेक इव्हेंटमध्ये भारताला पदक जिंकून दिलं आहे. १९५१ मध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत बारबरा वेबस्टरने भारताला गोळा फेक इव्हेंटमध्ये कांस्यपदक मिळवून दिलं होतं. (Latest sports updates)
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांचा दबदबा...
आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय नेमबाजांनी दमदार कामगिरी केली आहे. २९ सप्टेंबर रोजी महिलांच्या १० मीटर एयर पिस्तूल इव्हेंटमध्ये पलकने सुवर्ण तर ईशाने रौप्यपदकाला गवसणी घातली आहे. भारताला नेमबाजीत आतापर्यंत १९ पदकं मिळाली आहेत.
आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदकांची यादी (अपडेटेड)
चीन - एकुण पदकं २०० (१०५ सुवर्णपदकं, ६३ रौप्यपदकं, ३२ कांस्यपदकं
दक्षिण कोरीया - एकुण पदकं १०२ (२६ सुवर्णपदकं, २८ रौप्य, ४८ कांस्यपदकं)
जपान- एकुण पदकं ९९ (२७ सुवर्णपदकं, ३५ रौप्यपदकं, ३७ कांस्यपदकं)
भारत- एकुण पदकं ३४ (८ सुवर्णपदकं, १३ रौप्यपदकं, १३ कांस्यपदकं)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.