Sanju Samson and Suryakumar Yadav saam tv
Sports

Asia Cup 2025 : संजू सॅमसनचं काय होणार? कॅप्टन सूर्यकुमार यादवने दिलं कडक उत्तर, अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन

Asia Cup 2025 Sanju Samson future Suryakumar response : आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरुवात होत आहे. त्याआधीच आठ संघांच्या कर्णधारांनी ट्रॉफीसह फोटोसेशन केलं. त्यानंतर सर्व संघांच्या कर्णधारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. त्यात संजू सॅमसनबाबतच्या प्रश्नावर सूर्यकुमार यादवने उत्तर दिले. त्यामुळे संजू सॅमसनचं काय होणार, असा प्रश्न कायम आहे.

Nandkumar Joshi

  • आशिया कप २०२५ स्पर्धेला सुरुवात

  • १० सप्टेंबरला भारत विरुद्ध यूएई भिडणार

  • संजू सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल का?

  • टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनं दिलं उत्तर

आशिया कप २०२५ स्पर्धेआधीच भारत विरुद्ध पाकिस्तान सामना आणि या स्पर्धेसाठी भारतीय संघाची झालेली निवड यावरून बरीच वावटळं उठली. आता प्रत्यक्ष रण सुरू होणार आहे. भारताचा संघ १० सप्टेंबरपासून रणांगणात उतरणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना १० सप्टेंबरला यूएईविरुद्ध होणार आहे. त्याआधीच भारताच्या प्लेइंग इलेव्हनबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे. सूर्यकुमार यादवला संजू सॅमसनच्या समावेशाबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर सूर्यकुमारने उत्तर दिले.

काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

संजू सॅमसनबाबत सूर्यकुमार यादवला प्रश्न विचारण्यात आला. पण त्यानं तो त्याच्या फलंदाजीप्रमाणेच जबरदस्त टोलवून लावला. भारताकडे जितेश शर्मा आणि संजू सॅमसन असे दोन विकेटकीपर आहेत. या दोघांपैकी कोण खेळणार आणि संजूला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का? असा प्रश्न विचारला गेला. त्यावर संजू सॅमसनवर आमचं लक्ष केंद्रीत आहे, तुम्ही त्याची चिंता करू नका. आम्ही उद्या म्हणजेच सामन्याच्या दिवशी योग्य तो निर्णय घेऊ, असं सूर्यकुमार म्हणाला.

जितेश शर्मालाच संधी मिळणार?

भारतीय संघाच्या सराव सत्रात जे चित्र दिसले त्यावरून वेगवेगळे अंदाज लावले जात आहेत. संजू सॅमसनचं प्लेइंग ११ मध्ये खेळणं कठीण वाटत आहे, असं मानलं जात आहे. कारण जितेश शर्मा हा विकेटकीपिंगचा सराव करताना दिसला. त्यामुळे तोच पहिल्या पसंतीचा विकेटकीपर असण्याची शक्यता आहे. जर असं झालं तर प्लेइंग इलेव्हन कशी असेल हे जाणून घेऊयात.

कशी असू शकते प्लेइंग इलेव्हन?

सलामीला अभिषेक शर्मासोबत शुभमन गिल खेळायला मैदानात उतरेल. त्यानंतर तिलक वर्मा, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंह असा फलंदाजी क्रम असेल. सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या असेल. त्यानंतर अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव आणि जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur : ऐन दिवाळीत दिवाळे! महाराष्ट्रातील या बँकेवर RBI चे कठोर निर्बंध, पैशांचं काय होणार?

Housing Society Elections : गृहनिर्माण सोसायट्यांच्या निवडणूका ऑनलाइन होणार; सरकारनं नेमका काय निर्णय घेतलाय? VIDEO

Maratha vs OBC Row : 'अजित पवारांनी साप पोसलेत' भुजबळांनंतर जरांगेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

KDMC : कल्याणमधील कचरा संकलनाचा ठेका किती कोटींचा? अधिकाऱ्यांनाच ठाऊक नाही, पालिकेत नेमकं काय घडतंय?

Rohit Sharma : रोहित शर्माचं वाढलेलं पोट सपाट, 'हिटमॅन' झाला फीटमॅन

SCROLL FOR NEXT