आशिया कप २०२५ आणि यूएई तिरंगी मालिकेसाठी पीसीबीने पाकिस्तानचा १७ सदस्यीय संघ जाहीर.
बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानला संघातून वगळत सलमान अली आघाला कर्णधारपदाची जबाबदारी.
शाहीन शाह आफ्रिदी, हरिस रौफ यांच्यासह तरुण खेळाडूंना संधी; पाकिस्तान संघात नवे चेहरे समाविष्ट.
Asia Cup : आशिया कप २०२५ साठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पाकिस्तानचा संघ जाहीर केला आहे. पीसीबीने यूएईमध्ये होणाऱ्या तिरंगी मालिकेसाठी आणि आशिया कपसाठी १७ सदस्यीय संघ जाहीर केला आहे. या संघातून बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना वगळण्यात आले आहे. सलमान अली आगाकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
माजी कर्णधार बाबर आझम आणि वनडे कर्णधार मोहम्मद रिझवान यांना यूएई तिरंगी मालिका आणि आशिया कप या दोन स्पर्धांसाठीच्या पाकिस्तानच्या संघातून वगळण्यात आले आहे. हे दोघे आशिया कपच्या निमित्ताने टी-२० संघात परतू शकतात असे म्हटले जात होते. पण पीसीबीने दोघांनाही धक्का दिला आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या दोघांनीही डिसेंबर २०२४ मध्ये पाकिस्तानकडून शेवटचा टी२० आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
सलमान अली आघाकडे पाकिस्तानच्या टी२० संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. २०२५ च्या सुरुवातीपासून तो पाकिस्तान टी२० संघाचे नेतृत्त्व करत आहे. आशिया कपसाठी पीसीबीने तरुण खेळाडूंना संधी दिली आहे. सॅम अयुब, साहिबजादा फरहान, मोहम्मद हरिस आणि हसन नवाज यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ हे देखील पाकिस्तानच्या संघात सामील आहेत.
यूएई तिरंगा मालिका आणि आशिया कप २०२५ साठीचा पाकिस्तानचा संघ -
सलमान आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमान, हारिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारीस (यष्टीरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम, साहिबजादा फरहान, सईम अयूब, सलमान मिर्झा, शाहीन शाह आफ्रिदी आणि सुफियान मुकीम
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.