भारत विरुद्ध ओमान सामन्यात अक्षर पटेल दुखापतग्रस्त
कॅच पकडण्याच्या प्रयत्नात अक्षरच्या डोक्याला दुखापत
अक्षरला दुखापत झाल्याने टीम इंडियाचं वाढलं टेन्शन
Asia Cup 2025 मध्ये काल (१९ सप्टेंबर) भारत विरुद्ध ओमान हा सामना खेळला गेला. या सामन्यामध्ये भारताने २१ धावांनी ओमानचा पराभव केला आणि विजयाची हॅटट्रिक नोंदवली. आता आशिया कपमध्ये भारताचा संघ रविवारी (२१ सप्टेंबर) पाकिस्तानविरुद्ध सुपर ४ मधील सामना खेळणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे.
ओमानविरुद्धच्या सामन्यामध्ये भारताचा स्टार खेळाडू अक्षर पटेलला गंभीर दुखापत झाली. दुसऱ्या डावात ओमानचा संघ लक्ष्याचा पाठलाग करत होता. भारताची गोलंदाजी सुरु असताना १५ व्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलने कॅच घेण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू त्याच्या हातातून निसटला. कॅच पकडण्याच्या प्रयत्नात अक्षरचा तोल गेला आणि त्याचे डोके जमिनीवर आपटले. त्यानंतर तो मैदानाबाहेर गेला, तो परतलाच नाही. अक्षर पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात संघात सामील होईल की नाही असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
आशिया कपमध्ये भारत विरुद्ध ओमान सामन्यानंतर टीम इंडियाचे फिल्डिंग कोच टी. दिलीप यांनी अक्षर पटेलच्या दुखापतीबाबत माहिती दिली. अक्षर ठीक असल्याचे दिलीप यांनी सांगितले. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी टीम इंडियाकडे खूप कमी वेळ आहे. त्यामुळे अक्षर पटेल हा पुढच्या सामन्यात सहभागी होईल की नाही हे उद्याच समजेल.
टीम इंडियाने ओमानविरुद्धच्या सामन्यात प्लेईंग ११ मध्ये दोन बदल केले आहेत. जसप्रीत बुमराह आणि वरूण चक्रवर्ती यांनी संघातून वगळण्यात आले. त्यांच्या जागी अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा यांना संधी देण्यात आली. आता पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यामध्ये भारताच्या प्लेईंग ११ मध्ये कुणाकुणाला संधी मिळेल याकडे सर्वांची लक्ष लागले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.