IND Vs SL Asia Cup 2025 x
Sports

Asia Cup 2025 : अभिषेक-तिलकची दमदार खेळी, संजू सॅमसनही चमकला; श्रीलंकेसमोर 'इतक्या' धावांचे आव्हान

IND Vs SL Asia Cup 2025 : आशिया कप २०२५ च्या सुपर ४ मधील शेवटच्या सामन्यात भारत आणि श्रीलंका हे दोन संघ आमनेसामने आले. आशिया कपच्या अंतिम सामन्यापूर्वी हा सामना दुबईत रंगला आहे.

Yash Shirke

Asia Cup 2025 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (२८ सप्टेंबर) खेळला जाणार आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले आहेत. अंतिम सामन्याआधी दुबईतील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर भारत विरुद्ध श्रीलंका हा सुपर ४ मधील शेवटचा सामना रंगला. या सामन्यामध्ये भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ गडी गमावत २० ओव्हर्समध्ये २०२ धावा केल्या. सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला २०३ धावा कराव्या लागणार आहेत.

श्रीलंकेचा कर्णधार चारिथ असालंकाने टॉस जिंकला आणि भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केले. सामन्यासाठी भारतीय संघामध्ये दोन बदल करण्यात आले. जसप्रीत बुमराह आणि शिवम दुबे यांना विश्रांती देण्यात आली, त्यांच्या जागी अर्शदीप सिंह आणि हर्षित राणा यांना प्लेईंग ११ मध्ये सामील करण्यात आले.

अभिषेक शर्मा आणि शुबमन गिल ही सलामीची जोडी फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरली. शुबमन गिलला लवकर माघारी परतला. मथीशा पथिरानाने त्याला ४ धावांवर बाद केले. त्यानंतर आलेल्या कॅप्टन सूर्यकुमार यादवने १२ धावा केल्या. वनिंदू हसरंगाने त्याला एलबीडब्लू आउट केले. सलामीवीर अभिषेक शर्माने दमदार अर्धशतकीय खेळी केली. ६१ धावा करुन तो तंबूत परतला.

तिलक वर्मा आणि संजू सॅमसन या जोडीने खेळ पुढे नेला. दोघांनी भारतीय संघाची धावसंख्या १५० धावांच्या पुढे नेली. ३९ धावांवर संजू सॅमसन बाद झाला. त्यानंतर मैदानात उतरलेला हार्दिक पंड्याने फक्त २ धावा करुन परतला. तिलक वर्माने ४९ धावा केल्या. फक्त १ एका धावाने त्यांचे अर्धशतक हुकले. शेवटच्या ओव्हर्समध्ये अक्षर पटेलने २१ धावा केल्या. दासुन शनाका, वनिंदू हसरंगा, मथीशा पथिराना, चारिथ असालंका, दुष्मंथा चमीरा यांनी प्रत्येकी १ असे पाच गडी बाद केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actor Missing : 'मुन्ना भाई एमबीबीएस'मधील लोकप्रिय अभिनेता बेपत्ता; गर्लफ्रेंडसोबत होती भांडणं, नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update : निलेश गायवळ यावर आत्तापर्यंत १० गुन्हे दाखल

Accident News : समृद्धी महामार्गावर एका रात्रीत चार अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! ५ वर्षात मिळणार ५ लाखांचं व्याज; वाचा सविस्तर

Lifestyle: हार्ट अटॅक आणि स्ट्रोक येण्यामागे आपल्या 'या' घाणेरड्या सवयी कारणीभूत; धोका कोणाला जास्त?

SCROLL FOR NEXT