Asia Cup 2025 मधील अंतिम सामना दुबईत रंगला आहे. या सामन्यामध्ये पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना १४६ धावा केल्या. १४७ धावांचे लक्ष्य गाठताना भारताने १३ व्या ओव्हरपर्यंत ४ गडी गमावले आहेत. सलग ३ धक्के बसल्यानंतर संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांनी खेळ सावरला होता. १३ व्या ओव्हरमध्ये अबरार अहमदने संजू सॅमसनला बाद केले.
अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव आणि शुबमन गिल लवकर बाद झाल्यानंतर संजू सॅमसन-तिलक वर्मा या जोडीने सावधगिरीने खेळ केला. गरजेनुसार दोघेही खेळत होते. अशातच फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नांत संजू बाद झाला. त्याने २१ चेंडूत २४ धावांची संयमी आणि आवश्यक अशी खेळी केली. अबरार अहमदच्या ओव्हरमध्ये साहिबजादा रहमानने संजूला बाद केले.
सेट झालेल्या संजू सॅमसनला बाद केल्यानंतर अबरार अहमदने ट्रेडमार्क सेलिब्रेशन केले. त्याच्या सेलिब्रेशनचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. संजू बाद झाल्यावर त्याने मान उजव्या बाजूला नेत झटका दिला. त्याच्या सेलिब्रेशनमुळे याआधीही वाद झाला होता. या सेलिब्रेशनमुळे अबरार अहमदने याआधी माफी देखील मागितली होती.
पहिल्या डावाच्या १९व्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर पाकिस्तानचे सर्व खेळाडू बाद झाले. साहिबजादा फरहानने सर्वाधिक ५७ धावा केल्या, तर फखर जमान ४६ धावांवर बाद झाला. सैम अयुबने १४ धावा जोडल्या. बाकीचे पाकिस्तानी खेळाडू फार काही करू शकले नाहीत आणि अनेकजण तर शून्यावर बाद झाले. पाकिस्तानने १४६ धावा केल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.