bcci officials twitter
Sports

Asia Cup 2023: आमंत्रण फेटाळलं! आशिया चषकासाठी BCCI अधिकाऱ्यांचा पाकिस्तानात जाण्यास नकार;समोर आलं मोठं कारण

Pakistan Cricket Board Invites BCCI Officials: पाकिस्तान क्रिकेट बोर्डने रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला यांना आशिया चषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात येण्याचे आमंत्रण दिले होते.

Ankush Dhavre

India vs Pakistan, Asia Cup 2023:

बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला यांच्या पाकिस्तान दौऱ्याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. काही दिवसांपूर्वी पाकिस्तान क्रिकेट बोर्डने रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला यांना आशिया चषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानात येण्याचे आमंत्रण दिले होते.

त्यानंतर असं म्हटलं जात होतं की, रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला हे पाकिस्तानात जातील. मात्र याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

रॉजर बिन्नी आणि राजीव शुक्ला पाकिस्तानात जाणार का?

बीसीसीआयच्या एका सुत्राने म्हटले की, ' हो, पाकिस्तान क्रिकेट बोर्डने पाकिस्तानात येण्याचं निमत्रंण दिलं होतं. मात्र सध्याची परिस्थिती पाहता पाकिस्तानात जाणं कठीण आहे. केवळ खेळाडू नव्हे तर आमच्यासारखे अधिकारी देखील सरकारच्या अनूमतीशिवाय पाकिस्तानात जाऊ शकत नाही. त्यासाठी सरकारने हिरवं कंदील दाखवणं गरजेचं आहे. त्यानंतरच कुठलाही निर्णय घेतला जाईल.' (Latest sports updates)

आशिया चषक स्पर्धेला येत्या ३० ऑगस्टपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामनाा पाकिस्तान विरूद्ध नेपाळ या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. हा सामना पाकिस्तानात रंगणार आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे.

मात्र भारताने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास स्पष्ट नकार दिला होता. त्यामुळे या स्पर्धेचे आयोजन हायब्रिड मॉडेलमध्ये केले जाणार आहे. या स्पर्धेतील केवळ ४ सामने पाकिस्तानात तर उर्वरीत ९ सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत.

भारतीय संघाचा पहिला सामना येत्या २ सप्टेंबर रोजी रंगणार आहे. या सामन्यात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

तर ही स्पर्धा झाल्यानंतर दोन्ही संघांचा वर्ल्डकपमध्ये आमना सामना होणार आहे. भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेत १४ ऑक्टोबर रोजी भारत -पाकिस्तान सामना होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Accident : पुण्यात भीषण अपघात; वर्षश्राद्धाला जाताना काळाचा घाला; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात मुसळधार पावसाची हजेरी...

Strong Bones : हाडांना कमजोर करतात हे 7 अन्नपदार्थ; तज्ज्ञांनी दिला इशारा

मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या; राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवलं

Crime : प्रेमा तुझा रंग कसा? एक्स गर्लफ्रेंडला ९ वेळा चाकूने भोसकलं, नंतर बॉयफ्रेंडने स्वत: आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT