आशिया चषक स्पर्धेत २ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. या सामन्याबद्दल बोलताना माजी भारतीय क्रिकेटपटू सौरव गांगुली यांनी पाकिस्तान संघांबद्दल आणि पाकिस्तानच्या गोलंदाजी आक्रमनाबाबत भाष्य केलं आहे.
सौरव गांगुलींनी म्हटले की, 'रँकिंगने फारसा पडत नाही. फरक या गोष्टीचा पडतो की, सामन्याच्या दिवशी तुम्ही कशी कामगिरी करताय. तो एक चांगला संघ आहे. त्यांच्याकडे दमदार गोलंदाजी आक्रमण आहे. ज्यात नसीम शाह, शाहिन आफ्रिदी, हारिस राऊफ यांचा समावेश आहे. भारतीय संघ मजबुत संघ आहे. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत. जो संघ आपली योजना अधिक चांगल्या प्रकारे राबवेल तो सामना जिंकेल.” (Latest sports updates)
३ वेळेस होणार आमना सामना...
आगामी आशिया चषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ ३ वेळेस आमने सामने येऊ शकतात. यापूर्वी झालेल्या आशिया चषक २०२२ स्पर्धेत हे दोन्ही संघ २ वेळेस आमने सामने आले होते.
जर हे दोन्ही संघ अंतिम फेरीत दाखल झाले तर क्रिकेट चाहत्यांना भारचत- पाकिस्तानचे ३ सामने पाहायला मिळू शकतात.
वर्ल्डकपमध्ये येणार आमने सामने.. .
आशिया चषक २०२३ स्पर्धा झाल्यानंतर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ वर्ल्डकप स्पर्धेत देखील आमने सामने येणार आहेत. ५ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड विरूद्ध न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे.
हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडीयमवर रंगणार आहे. तर भारत पाकिस्तान यांच्यातील हाय व्हॉल्टेज १४ ऑक्टोबर रोजी रंगणार आहे.
हा सामना १५ ऑक्टोबर रोजी खेळवला जाणार होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव स्पर्धेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.