आगामी वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धा येत्या ५ ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या स्पर्धेतील सामने पाहण्यासाठी तिकीट विक्रीला सुरूवात झाली आहे.
भारतीय संघाच्या सामन्यांची तिकीटं वगळता इतर सर्व सामन्यांच्या तिकीट विक्रीला शुक्रवारपासून सुरूवात झाली आहे. ही तिकीटं Book My Show वर बुक करता येणार आहेत. मात्र तिकीट विक्रीच्या पहिल्याच दिवशी साईट डाऊन झाल्याचे पाहायला मिळाले आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, तिकीट विक्रीला सुरूवात होताच Book My Show ची वेबसाईट अवघ्या ३५ ते ४० मिनिटात क्रॅश झाली आहे. यासह अॅपवर देखील तिकीट बुक करताना अडचणींचा सामना करावा लागत होता.
भारतीय वेळेनूसार तिकीटांची बुकिंग रात्री ८ वाजता सुरू झाली होती. इतर सामन्यांच्या तिकीटांची बुकींग देखील याच वेळेवर सुरू होणार आहे.
तर झाले असे की, ८ वाजता तिकीट बुकिंगला सुरूवात झाली. एकाच वेळी अनेक लोक साईटवर आल्याने साईट क्रॅश झाली.
त्यानंतर संतापलेले फॅन्स सोशल मीडियावर तक्रार करताना दिसून आले होते. आगामी वर्ल्डकप स्पर्धेसाठी Book My Show तिकीट बुकिंग स्पॉन्सर आहे. (Latest sports updates)
भारतीय संघाच्या सामन्यांच्या तिकीट बुकिंगला केव्हा होणार सुरूवात?
येत्या ३० ऑगस्टपासून भारतीय संघाच्या गुवाहटी आणि तिरूवनंतपुरममध्ये होणाऱ्या सराव सामन्यांच्या तिकीट विक्रीला सुरूवात होणार आहे.
तर मुख्य सामन्यांबद्दल बोलायचं झालं तर येत्या ३१ ऑगस्टपासून भारतीय संघाच्या चेन्नई, दिल्ली आणि पुणे येथे होणाऱ्या सामन्यांची तिकीटं बुक करता येणार आहेत.
तर १ ऑगस्टपासून धर्मशाळा, लखनऊ आणि मुंबई येथे होणाऱ्या सामन्यांची तिकीटे बुक करता येणार आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.