Ashes 2025-26 saam tv
Sports

Ashes 2025-26: W,W,W,W,W,W,W... स्टार्कच्या वादळात इंग्लंडची दाणादाण, फक्त १७२ धावात उडाला खुर्दा

Australia vs England: क्रिकेटमधील सर्वात मोठी आणि ऐतिहासिक स्पर्धा असलेल्या ॲशेस २०२५-२६ सिरीजला आजपासून सुरुवात झालीये. पर्थवर पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने त्यात्या गोलंदाजीने संपूर्ण क्रिकेट जगताला हादरवून सोडलंय.

Surabhi Jayashree Jagdish

ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात एशेज खेळवण्यात येतेय. यामध्ये पाच सामन्यांच्या टेस्ट सिरीजमध्ये पहिला सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने त्याच्या घातक गोलंदाजीने पाहुण्या टीमची दाणादाण उडवली. पर्थ टेस्टमध्ये पहिल्याच डावाचा स्टार्कने इंग्लंडवर जोरदार गोलंदाजीचा मारा करत ७ विकेट्स काढले.

पर्थमध्ये खेळत असलेल्या सामन्यात पहिल्याच दिवशी इंग्लंडची हालत गंभीर झाली होती. पहिल्याच डावात अवघ्या ३२.५ ओव्हरमध्ये इंग्लंडची संपूर्ण टीम १७२ रन्सवर पव्हेलियनमध्ये परतली. यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने ७ विकेट्स घेतले. यामध्ये स्टार्कने त्याच्या सुरुवातीच्या दोन ओव्हर्समध्ये इंग्लंडला जोरदार धक्के दिले.

मिचेल स्टार्कने रचला महारिकॉर्ड

इंग्लंडच्या पहिल्या डावात स्टार्कने जॅक क्रॉली (0), बेन डकेट (21) आणि जो रूट (0) यांची विकेट काढली. त्याची गोलंदाजी इतकी भेदक होती की प्रत्येक चेंडूवर विकेट मिळेल असे वाटत होते. या सामन्यात 3 विकेट्स घेताच स्टार्कने एशेज सिरीजमध्ये त्याचे 100 विकेट्स पूर्ण केले. एशेजच्या इतिहासात 100 विकेट घेणारा तो 21वा गोलंदाज ठरलाय.

एंडरसनचा विक्रम मोडला

पर्थ टेस्ट सामन्याच्या पहिल्याच ओव्हरमध्ये जॅक क्रॉलीला बाद करून स्टार्कने इतिहास रचला. त्याच्या डेब्यूनंतर टेस्ट सामन्याच्या पहिल्या डावातील पहिल्या ओव्हरमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज म्हणून त्याच्या नावाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये त्याने इंग्लंडचा गोलंदाज जेम्स एंडरसनचा विक्रम मोडलाय.

मिचेल स्टार्कचे महत्त्वाचे रेकॉर्ड

  • 35 वर्षीय मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियासाठी आतापर्यंत 101 टेस्ट सामन्यांच्या 193 डावांत 405 विकेट्स घेतले आहेत.

  • स्टार्कने 16 वेळा डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

  • टेस्टमध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी ही 94 रन्समध्ये 11 विकेट्स अशी आहे.

  • 130 वनडे सामन्यांत स्टार्कने 247 विकेट्स घेतले असून 9 वेळा डावात 5 विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे.

  • वनडेत त्याची सर्वोत्तम कामगिरी 28 रन्समध्ये 6 विकेट्स आहे.

  • ऑस्ट्रेलियासाठी खेळलेल्या 65 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत त्याने 79 विकेट्स घेतले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नराधमाला फाशी द्या! मालेगावमध्ये मोर्चादरम्यान आंदोलकांनी गेट तोडलं, पोलिसांचा लाठीचार्ज |VIDEO

Shocking : 'तू लडका है या लडकी' म्हणत तरुणीचा विनयभंग अन् मारहाण,उल्हासनगर हादरलं!

Maharashtra Politics: शिवसेनेला मोठं खिंडार, बड्या नेत्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Maharashtra Politics : उद्धव ठाकरेंसाठी इकडे आड, तिकडे विहीर! काँग्रेस-मनसेच्या भूमिकेमुळे अडकले कात्रीत

Hirve Moong Bhaji Recipe: हिरव्या मुगाची झणझणीत भाजी कशी बनवायची?

SCROLL FOR NEXT