Shubman Gill saam tv
Sports

Shubman Gill: यंदाचा लग्नाचा बेत आहे का? शुभमन गिलला प्रश्न विचारण्यामागचं कारण काय, कोण आहे ती?

Shubman Gill Reaction on Wedding Plan: सोमवारी झालेल्या सामन्यात शुभमन गिलला त्याच्या लग्नासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. मात्र हा प्रश्न शुभमनला का विचारला गेला तसंच सध्या कोणासोबत त्याचं नाव जोडलं जातंय हे पाहूयात.

Surabhi Jayashree Jagdish

शुभमन गिल सध्या टीम इंडियाचा सर्वात चर्चेत असणारा खेळाडू आहे. टॅलेंटेड आणि हँडसम असणार्‍या या खेळाडूच्या मागे अनेक मुली फिदा आहेत. मधल्या काळात शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर डेट करत असल्याचा चर्चा रंगल्या होत्या. अशातच शुभमनच्या लग्नाबाबत एक किस्सा समोर आला आहे.

सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यापूर्वी टॉसच्या वेळी डॅनी मॉरिसनने गिलला त्याच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला. त्यामुळे आता पुन्हा एकदा गिलच्या लग्नाची चर्चा रंगू लागली आहे.

लग्नाचा प्लॅन कधी?

टॉस दरम्यान डॅनी मॉरिसनने गिलला विचारलं की, तू छान दिसतोय, लग्नाचा काही प्लॅन आहे का? मॉरिसनच्या या प्रश्नाला उत्तर देताना गिल म्हणाला की, नाही, अजून तरी असा काहीही बेत आखलेला नाही. मात्र हे उत्तर देताना शुभमन गिला काही लाजला असल्याचं कॅमेरात कैद झालं.

प्रश्न विचारण्यामागे कारण काय?

शुभमन गिलच्या डेटिंगच्या अनेक अफवा आतापर्यंत पसरल्या आहेत. मात्र यावर खुलेपणाने कधीही गिल बोलला नाही. गेल्या काही महिन्यांपासून टीव्ही अभिनेत्री अवनीत कौरचं नाव शुभमन गिलसोबत जोडलं जातंय.

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चे सामना पाहण्यासाठी अवनीत कौर दुबईमध्ये पोहोचली होती. त्यानंतर शुभमन आणि अवनीत रिलेशनशिपमध्ये असल्याचं बोललं जातंय. यापूर्वी सारा अली खान आणि सारा तेंडुलकर यांच्याशी देखील शुभमनचं नाव जोडलं गेलं होतं. काही दिवसांपूर्वीच सारा तेंडुलकर आणि शुभमन गिल यांनी एकमेकांना इन्स्टाग्रामवरून अनफॉलो केल्याचंही समोर आलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gairan Land: मनपा-नगरपालिका क्षेत्रातील गायरान जमिनीवरील आरक्षण उठवलं; सरकारचा मोठा निर्णय

US–Iran Conflict: अमेरिका-इराण युद्ध धर्मिक वळणार? डोनाल्ड ट्रम्प यांचा धर्मयुद्धाचा प्लॅन?

Ajit Pawar Plane Crash: जय पवारांची पत्रकार परिषद रद्द? VSR च्या मालकाचा 'बोलविता धनी' कोण?

कुत्र्याने चावा घेतल्याने म्हैस आक्रमक, अनेकांना जमिनीवर पाडलं, हल्ल्यात एकाचा मृत्यू

गाढवं पाळा, तरुण आणि श्रीमंत व्हा? गाढवाच्या कातडीपासून बनतं चमत्कारी औषध?

SCROLL FOR NEXT