Ajinkya Rahane: सलग दुसऱ्या पराभवानंतर संतापला अजिंक्य रहाणे; 'या' खेळाडूंवर फोडलं खापर

IPL 2025: सोमवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सला सलग दुसऱ्या पराभावाचा सामना करावा लागला. यानंतर अजिंक्य रहाणेने नेमकी चूक कुठे होतेय याबाबत सांगितलंय. रहाणे काय म्हणाला ते पाहा.
Ajinkya Rahane furious
Ajinkya Rahane furioussaam tv
Published On

सोमवारी कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात पुन्हा एकदा गुजरात टायटन्से बाजी मारत कोलकात्याचा पराभव केला. या सामन्यामध्ये गुजरातने ३९ रन्सने विजय मिळवला. या विजयासह गुजरातने यंदाच्या सिझनमध्ये सहावा विजय मिळवला आहे.

या विजयामुळे एकूण १२ पॉईंट्समुळे शुभमन गिलच्या नेतृ्त्वाखाली पॉईंट्स टेबलमध्ये टीम पहिल्या स्थानावर आहे. दरम्यान या पराभवामुळे कोलकाताच्या टीमला प्लेऑफ गाठणं कठीण होणार आहे. यावेळी पराभवानंतर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार अजिंक्य रहाणे काय म्हणाला ते पाहूयात.

Ajinkya Rahane furious
CSK Playoffs Equation: MI विरूद्धच्या पराभवानंतर चेन्नई प्लेऑफ कशी गाठणार? पाहा 6 सामने गमावल्यानंतर कसं आहे समीकरण?

फलंदाजी सुधारण्याची गरज

कोलकाता नाईट रायडर्सच्या टीमला यंदाच्या आयपीएलमध्ये पहिल्यांदाच सलग २ वेळा पराभवाचा सामना करावा लागला. गुजरातकडून मिळालेल्या पराभवानंतर रहाणे म्हणाला की, १९९ रन्सचं टार्गेट पूर्ण केलं जाऊ शकत होतं. आमचा प्रयत्न गुजरातला २०० रॅन्सच्या आत रोखून धरण्याचा होता आणि आम्ही त्यामध्ये यशस्वीही झालो. गोलंदाजांशी माझी काहीही तक्रार नाही. आम्हाला फलंदाजी सुधारण्याची गरज आहे.

Ajinkya Rahane furious
टीम इंडियात काहीतरी घडतंय? कोचिंग स्टाफमधून हटवलेल्या अभिषेक नायरला रोहित शर्मा म्हणाला, थँक्स ब्रो!

फिल्डींगही सुधारण्याची गरज

सामन्यानंतर बोलताना, फिल्डींग देखील सुधारली पाहिजे असं रहाणेने म्हटलंय. रहाणेने सांगितलं की, फिल्डींग एक असा पैलू आहे ज्यामध्ये तुम्ही सुधारणा करू शकता. जर मैदानावर १०-१५ रन्स वाचवले तर टीमसाठी ते खूप फायदेशीर ठरतं.

Ajinkya Rahane furious
शुबमन गिल लवकरच अडकणार विवाहबंधनात? टॉसदरम्यान विचारलेल्या प्रश्नावर गुजरातचा कॅप्टन काय म्हणाला?

गुजरात टायटन्सचा उत्तम खेळ

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातची टीम यावेळी चांगला खेळ करताना दिसतेय. पर्पल आणि ऑरेंज अशा दोन्ही कॅप या संघाकडे असल्याची माहिती आहे. सध्या आयपीएलमधील सर्वाधिक रन्सची ऑरेंज कॅप ही साई सुदर्शनकडे आहेत. त्याने ८ सामन्यांमध्ये ४१७ रन्स केले आहेत. तर पर्पल कॅप ही प्रसिद्ध कृष्णाकडे आहे. त्याने आतापर्यंत १४ विकेट्स पटकावलेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com