ambati rayudu on virat kohli saam tv
Sports

Ambati Rayudu On Virat Kohli: "वैयक्तिक रेकॉर्ड्स बाजूला ठेवले असते,तर..",अंबाती रायडूचा नाव न घेताच विराटवर हल्लाबोल

Ambati Rayudu Tweet: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातील सामन्यावरुन अंबाती रायडूने एक पोस्ट शेअर करत विराटवर निशाणा साधला आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील प्लेऑफ सुरु होण्यापूर्वीच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये नॉकआऊटचा सामना पार पडला. चेन्नईला प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी २०१ धावांची गरज होती. मात्र या धावांचा बचाव करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २७ धावांनी बाजी मारली.

या विजयासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. तर चेन्नईचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला. या पराभवानंतर माजी खेळाडू अंबाती रायडू नाराज असल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान आता त्याने एक्स पोस्ट शेअर करत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघावर निशाणा साधला आहे.

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामना झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील खेळाडू मैदानावर जल्लोष साजरा करताना दिसून आले होते. त्यावेळी एमएस धोनी खेळाडूंसोबत हात मिळवण्यासाठी थांबला होता. मात्र रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघातील खेळाडू जल्लोष साजरा करण्यात व्यस्त होते, हे पाहून एमएस धोनी निघून गेला. यावरुन धोनीवर टिका देखील केली गेली. या सामन्यानंतर अंबाती रायडू हात धुवून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या मागे लागला आहे.

आता त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने नाव न घेताच विराटवर निशाणा साधला आहे. त्याने पोस्ट शेअर करत लिहीले की, " मला खूप वाईट वाटतं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे फॅन्स कित्येक वर्षांपासून आपल्या संघाला सपोर्ट करत आहेत. जर आरसीबीच्या मॅनेजमेंट आणि लीडर्सने आपले वैयक्तिक रेकॉर्ड्स बाजूला ठेवले असते, तर या संघाने आतापर्यंत कितीतरी ट्रॉफी जिंकल्य असत्या. कितीतरी शानदार खेळाडूंना या फ्रँचायझीने जाऊ दिलं आहे. संघाच्या मॅनेंजमेंटवर दबाव टाकला गेला पाहिजे. मेगा ऑक्शनपासून नव्या पर्वाला सुरुवात करता येऊ शकते."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

50 हजार फॉलोअर्स असलेली रिलस्टार निघाली चोर, बॉयफ्रेंडच्या मदतीने करायची महिलांच्या पर्स लंपास

Maharashtra Live News Update: पुण्यात मतदार यादींवर हरकतींचा पाऊस

Maharashtra Politics: रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं विरोधकांची कोंडी, शिंदेसेनेविरोधात चव्हाणांची रणनीती काय?

IND vs SA ODI: क्विंटन डी कॉकच्या विकेटनंतर कोहलीचं भन्नाट सेलिब्रेशन; डान्सचा व्हिडिओ व्हायरल

केंद्रीय कृषीमंत्री-मुख्यमंत्र्यांमध्ये विसंवाद? राज्याने केंद्राला अतिवृष्टीचा प्रस्ताव पाठवला की नाही?

SCROLL FOR NEXT