SRH vs RR, Qualifier 2: क्वालिफायरचा सामना न खेळताच हैदराबादला मिळणार फायनलचं तिकीट; वाचा कारण

SRH vs RR, Weather Update: क्वालिफायर २ चा सामना सनरायझर्स हैदाराबाद आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
SRH vs RR, Qualifier 2:  क्वालिफायरचा सामना न खेळताच हैदराबादला मिळणार फायनलचं तिकीट; वाचा कारण
SRH vs RR Weather Update

आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायर २ चा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये होणार आहे. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता चेन्नईतील चेपॉकच्या मैदानावर रंगणारआहे. कोलकाता नाईट रायडर्सने आधीच फायनलमध्ये प्रवेश केला आहे.

तर आज होणाऱ्या सामन्यात जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससोबत दोन हात करताना दिसेल. दरम्यान तुम्हालाही प्रश्न पडलाच असेल ना, जर आज होणाऱ्या सामन्यात पाऊस पडला,तर कोणता संघ फायनलमध्ये जाणार? जाणून घ्या.

सामना पावसामुळे धुतला गेल्यास कोण जाणार फायनलमध्ये?

आयपीएल २०२४ स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. क्वालिफायर २ च्या सामन्यात जर पावसाने हजेरी लावली, तर षटकं कमी केली जातील. या सामन्यासाठी अतिरिक्त १२० मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे. कमीत कमी ५-५ षटकांचा सामना खेळवण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र तेही शक्य झालं नाही, तर सुपर ओव्हरच्या साहाय्याने निकाल लावला जाईल. दरम्यान सामना पावसामुळे रद्द झाल्यास सनरायझर्स हैदराबादचा संघ थेट फायनलमध्ये जाईल.

SRH vs RR, Qualifier 2:  क्वालिफायरचा सामना न खेळताच हैदराबादला मिळणार फायनलचं तिकीट; वाचा कारण
SRH vs RR,Qualifier 2: कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? हैदराबादचे फलंदाज vs राजस्थानच्या गोलंदाजांमध्ये रंगणार लढत

सनरायझर्स हैदराबाद संघाला थेट फायनलमध्ये जाण्याची संधी असणार आहे. कारण सनरायझर्स हैदराबादचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी होता. तर राजस्थान रॉयल्सचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी होता. साखळी फेरीतील १४ सामने झाल्यानंतर सनरायझर्स हैदराबादचा संघ १७ गुणांसह आणि +०.४१४ नेट रनरेटसह गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी होता. तर राजस्थान रॉयल्स सं १७ गुण +०.२७३ नेट रनरेटसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.

SRH vs RR, Qualifier 2:  क्वालिफायरचा सामना न खेळताच हैदराबादला मिळणार फायनलचं तिकीट; वाचा कारण
SRH vs RR,Qualifier 2: केव्हा, कुठे अन् कधी रंगणार क्वालिफायर २ चा थरार? एकाच क्लिकवर जाणून घ्या सर्वकाही

कसं असेल हवामान?

accuweather ने दिलेल्या माहितीनुसार, क्वालिफायर २ सामन्यावेळी चेन्नईत पावसाची शक्यता खूप कमी आहे. सामन्यादरम्यान पाऊस पडण्याची शक्यता २ टक्के इतकीच असणार आहे . दरम्यान सामन्यावेळी ढगाळ वातावरण असू शकतं. मात्र तरीही क्रिकेट चाहत्यांना २०-२० षटकांचा सामना पाहायला मिळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com