SRH vs RR,Qualifier 2: कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? हैदराबादचे फलंदाज vs राजस्थानच्या गोलंदाजांमध्ये रंगणार लढत

SRH vs RR, IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायरच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये होणार आहे.
SRH vs RR,Qualifier 2: कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? हैदराबादचे फलंदाज vs राजस्थानच्या गोलंदाजांमध्ये रंगणार लढत
SRH vs RR Qualifier ipl 2024
Published On

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल २०२४ स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. तर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमध्ये फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी चुरशीची लढत रंगणार आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायर २ चा सामना चेन्नईत रंगणार आहे. या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचे फलंदाज आणि राजस्थान रॉयल्सचे गोलंदाज असा सामना रंगण्याची शक्यता आहे.

कोणाला मिळणार फायनलचं तिकीट?

सनरायझर्स हैदराबाद संघाकडून अभिषेक शर्मा आणि ट्रेविस हेडच्या जोडीने तांडव केला आहे. दोघांनीही सलामीला येत गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला आहे. ट्रेविस हेडने या हंगामात फलंदाजी करताना १९९.६२ च्या स्ट्राइक रेटने ५३३ धावा चोपल्या आहेत. तर अभिषेक शर्माने २०७ च्या स्ट्राइक रेटने ४७० धावा केल्या आहेत.

SRH vs RR,Qualifier 2: कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? हैदराबादचे फलंदाज vs राजस्थानच्या गोलंदाजांमध्ये रंगणार लढत
IPL RR vs RCB Eliminator : RCBचं ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्नं भंगलं! परागच्या 'रॉयल' खेळीनं राजस्थानचा शानदार विजय

क्लासेनही तुफान फॉर्ममध्ये

या हंगामात हैदराबादचा फलंदाजी क्रम मजबूत असल्याचं दिसून आलं आहे. हेड आणि अभिषेकच्या जोडीनंतर क्लासेनही गोलंदाजांवर तुटून पडतोय. त्याने १८० च्या स्ट्राइक रेटने ४१३ धावा केल्या आहेत. त्यामुळे सलामी जोडी बाद केली म्हणजे काम संपलं असं समजून चालणार नाही. कारण क्लासेनही मोठे फटके खेळून संघाला मोठी धावसंख्या उभारून देऊ शकतो.

SRH vs RR,Qualifier 2: कोणाला मिळणार फायनलचं तिकीट? हैदराबादचे फलंदाज vs राजस्थानच्या गोलंदाजांमध्ये रंगणार लढत
IPL Records: आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज; किंग कोहली नंबर १

राजस्थान रॉयल्सची मजबूत गोलंदाजी

गोलंदाजी हा राजस्थान रॉयल्सचा मुख्य पक्ष आहे. हा सामना चेन्नईत होणार आहे. त्यामुळे आर अश्विन या सामन्यात महत्वाची भूमिका बजावू शकतो. त्याला या खेळपट्टीवर खेळण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच युजवेंद्र चहलही त्याला चांगली साथ देतोय. दोघेही मधल्या षटकांमध्ये धावांची गती राखून ठेवतात. त्यामुळे विरोधी संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरतो. यांना जोड म्हणून टी नटराजन आणि भुवनेश्वर कुमारही चांगली गोलंदाजी करतोय. त्यामुळे हैदराबादचे फलंदाज आणि राजस्थानचे गोलंदाज असा सामना पाहायला मिळेल यात काहीच शंका नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com