MS Dhoni CSK Captain :चेन्नई सुपर किंग्सच्या संघामध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. ऋतुराज गायकवाड दुखापतग्रस्त असल्याने आयपीएल २०२५ मधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी एमएस धोनीकडे कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. सीएसकेच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
ऋतुराज गायकवाड कोपराच्या फ्रॅक्चरमुळे IPL 2025 मधून बाहेर पडला आहे. एमएस धोनी यापुढे सीएसकेचा कर्णधार असेल, असा मजकूर असलेली पोस्ट चेन्नईच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर शेअर करण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयावर अंबाती रायडूने त्याची प्रतिक्रिया दिली आहे. रायडूचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
'सर्वप्रथम सीएसकेचा कर्णधार ऋतुराज गायकवाड आयपीएल २०२५ मधून पडला आहे, हे फारच दुःखद आहे. पण एमएस धोनी पुन्हा एकदा चेन्नईचा कर्णधार झाल्याचे पाहायला सर्व चाहते नक्कीच खूप उत्सुक असतील. जर धोनीने त्याची जादू दाखवून दिली आणि सीएसकेला या परिस्थितीतून बाहेर काढून प्लेऑफपर्यंत पोहोचवले तर ही एक अविश्वसनीय कहाणी असेल. मी खूप जास्त उत्साहित आहे. एमएस सीएसके संघावर त्याची जादू विणेल अशी मला आशा आहे', असे वक्तव्य अंबाती रायडूने केले आहे.
अंबाती रायडू मागील काही दिवसांपासून ट्रोल होत आहे. आयपीएलमध्ये कॉमेंट्री करत असताना तो सतत धोनीच्या नावाचा जप करतो असे अनेकजण म्हणतात. नेहमीच एमएस धोनीचे कौतुक करत असल्याने त्याच्यावर टीका देखील होत आहे. या प्रकरणावरुन अंबाती रायडू इतर समालोचकांशी बाचाबाची करत असल्याचेही पाहायला मिळाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.