team india saam tv
Sports

WTC Final: टीम इंडियाचा विजय पक्काच समजा! WTC फायनलसाठी BCCI ने खतरनाक खेळाडूला दिला अचानक प्रवेश

Ravindra Jadeja: या संघात एक असा खेळाडू आहे जो भारतीय संघाला एकहाती सामना जिंकून देऊ शकतो.

Ankush Dhavre

WTC Final Squad: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा बिगुल वाजला आहे. येत्या ७ ते ११ जून दरम्यान हा सामना लंडनमधील केनिंगटन ओव्हलच्या मैदानावर पार पडणार आहे.

या सामन्यासाठी काही दिवसांपूर्वीच क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा केली होती. दरम्यान मंगळवारी बीसीसीआयने भारतीय संघाची घोषणा केली आहे.

या संघात काही खेळाडूंना बाहेर केलं गेलं आहे. तर काही खेळाडूंना एंट्री दिली गेली आहे. या संघात एक असा खेळाडू आहे जो भारतीय संघाला एकहाती सामना जिंकून देऊ शकतो.

भारतीय संघात धाकड खेळाडूची एंट्री..

भारतीय संघाला एकहाती सामना जिंकून देणारा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा आहे. रवींद्र जडेजा हा फलंदाजी आणि गोलंदाजीसह अप्रतिम क्षेत्ररक्षण करून भारतीय संघाच्या विजयात मोलाचे योगदान देत असतो.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन सामना फिनिश करण्याची जबाबदारी असणार आहे, तसेच फिरकी गोलंदाजी करण्यासह तो आपल्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाने देखल सामना फिरवू शकतो.

त्यामुळे रवींद्र जडेजा हा भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सामना जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावू शकतो.

आता भारतीय संघाचा विजय पक्का!

रोहित शर्मा रवींद्र जडेजाला प्लेइंग ११ मध्ये स्थान देणार यात काहीच शंका नाही. कारण जडेजाला बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे. गेल्या काही वर्षांपासून त्याने आपल्या अष्टपैलू कामगिरीने भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. रवींद्र जडेजाचे कमबॅक झाल्याने ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात देखील चिंतेचं वातावरण असणार आहे.

रवींद्र जडेजाचा रेकॉर्ड:

रवींद्र जडेजाने भारतीय संघासाठी ६४ कसोटी सामन्यांमध्ये २६४ गडी बाद केले आहेत. तर फलंदाजी करताना २६५८ धावा देखील केल्या आहेत. तर वनडे क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने १७४ सामन्यांमध्ये १९१ गडी बाद केले आहेत.यादरम्यान त्याने २५२६ धावा केल्या आहेत. तर ६४ टी-२० सामन्यांमध्ये त्याने गोलंदाजी करताना ५१ गडी बाद केले आहेत. तर फलंदाजी करताना त्याने ४५७ धावा केल्या आहेत. (Latest sports updates)

WTC फायनलसाठी असा आहे भारतीय संघ :

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, केएस भरत (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : राज्यातील ७५ हजार युवक युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देणार - लोढा

Thar Car Accident: महिलेने नवी कोरी थार घेतली, लिंबूवरून नेली अन् घडलं भयंकर, VIDEO होतोय व्हायरल

'Bigg Boss 19'च्या तिसऱ्या आठवड्यात होणार डबल एलिमिनेशन? 4 सदस्य झाले नॉमिनेट

Gold Rate: सोन्याचे दर पुन्हा वाढले; प्रति तोळ्यामागे किती पैसे मोजावे लागणार? वाचा सविस्तर

MHADA Home : सर्वसामान्यांच्या स्वप्नांना ब्रेक! म्हाडाच्या घरांची दिवाळीतील सोडत रखडली, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT