Mark Wood: LSG संघाला मोठा धक्का! संघातील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज घेणार IPL 2023 स्पर्धेतून माघार, वाचा काय आहे कारण

Lucknow Super Gaints - Mark Wood Ruled Out: लखनऊ सुपर जायंट्स संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.
LSG VS PBKS
LSG VS PBKS Saam TV

IPL 2023: केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारा लखनऊ सुपर जायंट्स सध्या आयपीएल २०२३ स्पर्धेत जोरदार कामगिरी करतोय. या संघाने ७ पैकी ४ सामने जिंकले आहेत. हा संघ ८ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. दरम्यान चांगली कामगिरी करत असताना, लखनऊ सुपर जायंट्स संघाची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

LSG VS PBKS
GT vs MI IPL 2023: नरेंद्र मोदी स्टेडियमवर धावांचा पाऊस; गिल-मिलरने मुंबईला धुतलं, गुजरातची २०७ धावांपर्यंत मजल

या हंगामात लखनऊ सुपर जायंट्स संघासाठी वेगवान गोलंदाज मार्क वूडने जोरदार कामगिरी केली आहे. त्याने या संघासाठी सर्वाधिक गडी बाद केले आहेत.

मात्र तो आयपीएलच्या शेवटच्या सामन्यांमध्ये खेळताना दिसून येणार नाहीये. तो आपल्या बाळाच्या जन्मासाठी इंग्लंडला परतणार आहे. केएल राहुल आणि संपूर्ण संघासाठी ही आनंदाची बाब आहे मात्र लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या अडचणीत वाढ होणार हे नक्की आहे.

मार्क वूड हा लखनऊ सुपर जायंट्स संघातील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. या गोलंदाजाने ४ सामन्यांमध्ये ११ गडी बाद केले आहेत. येणारे काही सामने हे लखनऊ संघासाठी अतिशय महत्वाचे असणार आहे. या सामन्यांमधून जर तो बाहेर झाला, तर नक्कीच लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या अडचणी वाढणार आहेत. (Latest sports updates)

LSG VS PBKS
Team India WTC Final Squad: 'अजिंक्य' तारा परतला, तर सूर्य मावळला; WTC Final साठी टीम इंडियाची घोषणा

वूडच्या जागी कोण खेळणार?

मार्क वूड हा आजारी असल्यामुळे गेल्या २ सामन्यातून बाहेर होता. त्याच्याऐवजी अफगाणिस्तान संघाचा गोलंदाज नवीन उल हकला संधी दिली गेली. या संधीचं सोनं करत त्याने चांगली कामगिरी केली. मात्र तो मार्क वूडची जागा भरू शकणार नाही. या हंगामातील पहिल्याच सामन्यात वूडने दिल्ली विरुद्ध झालेल्या सामन्यात ५ गडी बाद केले होते. त्याच्या गतीसमोर कुठलाच फलंदाज धावा करू शकला नव्हता.

लखनऊ संघाचा पुढील सामना येत्या २८ एप्रिल रोजी पंजाब किंग्ज संघासोबत रंगणार आहे. या सामन्यानंतर लखनऊचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू सारख्या बलाढ्य संघासोबत होणार आहे. या सामन्यांमध्ये कमतरता जाणवू शकते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com