ajinkya rahane with cheteshwar pujara yandex
Sports

Team India News: रहाणे, पुजाराला निवृत्तीशिवाय पर्यायच नाही! हे 2 खेळाडू आहेत प्रबळ दावेदार

Dinesh Karthik On Team India: भारतीय संघाचा माजी खेळाडू दिनेश कार्तिकने अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराचा पर्याय सुचवला आहे.

Ankush Dhavre

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर गावसकर ट्रॉफी सुरू व्हायला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. भारतीय संघाने गेल्या दोन्ही मालिकांमध्ये ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात घुसून पराभूत केलं आहे.

आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ ऑस्ट्रेलियाला तिसऱ्यांदा पाणी पाजण्याच्या प्रयत्नात असणार आहे. मात्र यावेळी भारतीय संघातील प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे संघात असण्याची शक्यता खूप कमी आहे.

या दोघांनी भारतीय संघाला बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकून देण्यात अतिशय मोलाची भूमिका बजावली होती. मात्र आता भारताचा माजी खेळाडू दिनेश कार्तिकने या दोघांची रिप्लेसमेंट सांगितली आहे.

कोण घेऊ शकतो जागा?

दिनेश कार्तिकच्या मते सरफराज खान आणि शुभमन गिल हे दोघेही ही जागा भरून काढू शकतात. दिनेश कार्तिकने क्रिकबझच्या ' हेसेबी विद डीके' या कार्यक्रमांत हजेरी लावली होती. या शो मध्ये बोलताना तो म्हणाला की, ' शुभमन गिल आणि सरफराज खान यांनी नुकताच सुरुवात केली आहे. दोघांनी इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेत शानदार कामगिरी केली होती. मला खात्री आहे की, दोघांपैकी एक नक्कीच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आणि आपली सर्वोत्तम कामगिरी करणार. त्यांच्याकडे ते गुण आणि क्षमता आहे. हे दोघेही पुजारा आणि अजिंक्यची जागा घेतात का हे पाहणं महत्वाचं ठरेल.'

पुजारा, रहाणे संघातून बाहेर

चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे दोघेही भारतीय कसोटी संघातील प्रमुख फलंदाज आहेत.२०१८-१९ मध्ये ज्यावेळी भारताने ऑस्ट्रेलियात जाऊन कसोटी मालिका जिंकली होती. त्यावेळी या दोघांनी मोलाची भूमिका बजावली होती. पुजाराने सर्वाधिक ५२१ धावा केल्या होत्या. त्यानंतर २०२०-२१ मध्ये रहाणेने अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत शतकी खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता.

गिल, सरफराजची शानदार कामगिरी

गिलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून आपल्या कसोटी कारकिर्दीची सुरुवात केली होती. या मालिकेत त्याने सलामीला फलंदाजी करताना,२५९ धावा केल्या होत्या. या मालिकेत तो सर्वाधिक धावा करणारा सहावा फलंदाज ठरला होता. तर युवा फलंदाज सरफराज खानला इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. या मालिकेत त्याने ५० च्या सरासरीने २०० धावा केल्या होत्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rajmachi Landslide: मोठी बातमी! राजमा किल्ल्याकडे जाणाऱ्या मार्गावर मोठी दरड कोसळली; 100 पर्यटक अडकले

EPFO Update : EPFO ने बदलले नियम; आता UMANG अॅपवर मिळतील 'या' सुविधा

Maharashtra News Live Update: हिरण्यकेशी नदीच्या पाणी पातळीत वाढ, पूल गेला वाहून

Navi Mumbai: पांडवकडा धबधब्यात दोन तरुण गेले वाहून; शोधकार्य सुरू

BJP Parliamentary Board: भाजपमध्ये भाकरी फिरणार; संसदीय मंडळात होणार लवकरच फेरबदल?

SCROLL FOR NEXT