afghanistan cricket team google
Sports

IND vs AFG: भारतीय संघाविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी अफगाणिस्तानचा संघ जाहीर; राशिदसह प्रमुख खेळाडूचं संघात कमबॅक

Afghanistan Squad For IND vs AFG Series: टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी अफगाणिस्तानने आपल्या संघाची घोषणा केली आहे.

Ankush Dhavre

India vs Afghanistan T20I Series:

दक्षिण आफ्रिका दौऱ्यावरुन भारतीय संघ मायदेशात परतला आहे. भारतासमोर पुढील आव्हान अफगाणिस्तान संघाचं असणार आहे. टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे.

या मालिकेसाठी अफगाणिस्तानने आपल्या संघाची घोषणा केली आहे. इब्राहिम जादरान या मालिकेत अफगाणिस्तानचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. तर राशिद खान आणि मोहम्मद नबी यांना देखील या संघात स्थान देण्यात आलं आहे.

या खेळाडूंना मिळालं संघात स्थान..

भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी अफगाणिस्तान संघात रहमानुल्लाह गुरबाज आणि इकराम अलीखिल या यष्टीरक्षक फलंदाजांना संघात स्थान देण्यात आलं आहे. कर्णधार इब्राहिम जादरान आणि रहमानुल्लाह गुरबाजे हे दोघेही डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकतात.

तर मध्यक्रमात नजीबुल्लाह जादरान, रहमत शाह आणि मोहम्मद नबी आणि करीम जनत खेळताना दिसून येऊ शकतात. तसेच मुजीब उर रहमान आणि राशिद खान यांच्यावर फिरकी गोलंदाजी आक्रमण सांभाळण्याची जबाबदारी असणार आहे. यासह वेगवान गोलंदाजीची जबाबदारी फरीद अहमद, नवीन उल हक आणि फजल हक फारुकी यांच्यावर असणार आहे. (Latest sports news in marathi)

भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी असा आहे अफगाणिस्तानचा संघ:

इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), इकराम अलीखिल (यष्टीरक्षक), हजरतुल्लाह जजई,मोहम्मद नबी, करीम जनत, रहमत शाह, नजीबुल्लाह जादरान, अजमुल्लाह उमरजई, शराफुद्दीन अशरफ, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, फरीद अहमद, नवीन उल हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, केस अहमद, गुलबदीन नायब आणि राशिद खान.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पंढरपूर दौऱ्यावर

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

SCROLL FOR NEXT