टीम इंडियाने अफगाणिस्तानला पराभूत करत विश्वचषकात सलग दुसरा विजय मिळवला आहे. रोहित शर्माने शतकी खेळी करत अफगाणिस्तानविरुद्ध विजयाचा पाया रचला. त्यानंतर विराट कोहलीने संयमी खेळ दाखवला. विराटने विजयी चौकार मारत भारताला जिंकवलं. टीम इंडियाने ८ गडी राखून अफगाणिस्तानवर मोठा विजय मिळवला आहे. (Latest Marathi News)
अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हशमतुल्लाह शाहिदी आणि अजमतुल्लाने अर्धशतकी खेळी खेळली. या दोघांच्या खेळीच्या जोरावर अफगाणिस्तानने भारताला ५० षटकात ८ गडी गमावून २७२ धावांचं आव्हान दिलं. अफगाणिस्तानचा कर्णधार शाहिदीने ८० धावा केल्या.
अफगाणिस्तानने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि ईशान किशनने धमाकेदार सुरुवात केली. टीम इंडियाने ७ षटकात ५० धावा पूर्ण केल्या.
आजच्या अफगाणिस्तानविरुद्ध सामन्यात रोहित शर्मा तुफान फॉर्ममध्ये दिसला. रोहित शर्माने ३० चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. रोहितने सहाव्या षटकात दुसरा षटकार लगावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार लगावण्याच्या विक्रमाला गवसणी घातली.
कर्णधार रोहित शर्माने ६३ चेंडूत शतक पूर्ण केलं. तर भारताला ईशानच्या रुपात पहिला धक्का बसला. ईशान ४७ धावा करून तंबूत परतला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा देखील १३१ धावा करून माघारी परतला. त्यानंतर कोहली आणि श्रेयस अय्यर खेळपट्टीवर संयमी खेळ दाखवला.
विराट कोहलीने ३४ व्या षटकात विजयी चौकार मारत टीम इंडियाला जिंकवून दिलं. टीम इंडियाने ८ गडी राखून अफगाणिस्तानवर मोठा विजय मिळवला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.