Abhishek Sharma Becomes No 1 in ICC T20 Rankings saam tv
Sports

Abhishek Sharma : फायर हूँ मैं....पाकिस्तानला नडणारा अभिषेक शर्मा टी २० मध्ये @1

Abhishek Sharma ICC T20 Ranking : आशिया कप २०२५ मध्ये पाकिस्तानची धुलाई करणारा अभिषेक शर्मा टी २० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी विराजमान झाला आहे.

Nandkumar Joshi

पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीला पहिल्याच चेंडूवर उत्तुंग षटकार तडकावणाऱ्या अभिषेक शर्मानं नादच केलाय. आयसीसी टी २० रँकिगमध्ये ९०७ रेटिंगचा जादुई आकडा गाठला असून, अशी कामगिरी करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी ही किमया रनमशीन विराट कोहली आणि मिस्टर ३६० सूर्यकुमार यादवनं केली आहे. अभिषेक आयसीसी टी २० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी विराजमान आहे. वरूण चक्रवर्ती नंबर एकचा गोलंदाज, तर हार्दिक पंड्या नंबर १ ऑलराउंडर ठरला आहे.

आशिया चषक स्पर्धेत जबरदस्त फॉर्मात असलेल्या अभिषेक शर्मा यानं आयसीसी रँकिंगमध्ये कमाल केली आहे. आयसीसीनं बुधवारी २४ सप्टेंबरला रँकिंग प्रसिद्ध केली आहे. ओमानच्या विरुद्ध ३८ धावा, पाकिस्तानच्या विरुद्ध ७४ धावांची तडाखेबंद खेळी करणाऱ्या अभिषेक शर्माच्या रेटिंगमध्ये ३४ अंकांची भर पडली आहे. त्यामुळे आयसीसी टी २० रँकिंगमध्ये त्याची रेटिंग ९०७ झाली आहे. अभिषेक हा ९०० रेटिंगचा जादुई आकडा पार करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. तर गोलंदाजी रँकिंगमध्ये वरुण चक्रवर्ती, अष्टपैलू खेळाडूच्या रँकिंगमध्ये हार्दिक पंड्या पहिल्या स्थानी आहे.

टी २० मध्ये सर्वाधिक रेटिंग असलेले फलंदाज

  • डेविड मलान - ९१९ रेटिंग

  • सूर्यकुमार यादव - ९१२

  • विराट कोहली - ९०९

  • अभिषेक शर्मा - ९०७

  • एरॉन फिंच - ९०४

  • बाबर आझम - ९००

  • डेविड वॉर्नर - ८९४

  • केविन पिटरसन - ८८६

  • ट्रॅव्हिस हेड - ८८५

भारतीय फलंदाजांमध्ये अभिषेक शर्मा व्यतिरिक्त तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनाही एका स्थानाचा फायदा झाला आहे. तिलक तिसऱ्या, तर सूर्यकुमार यादव सहाव्या स्थानी आहे.

तर पाकिस्तानच्या साहिबजादा फरहान यानं ३१ स्थानांनी झेप घेत २४ व्या स्थानी पोहोचला आहे. हुसैन तलत यानं पाकिस्तानला श्रीलंकाविरुद्ध विजय मिळवून दिला होता. त्यामुळं टी २० फलंदाजांच्या रँकिंगमध्ये त्यानं १४७४ स्थानांनी झेप घेत २३४ व्या स्थान पटकावलं आहे.

गोलंदाजांमध्ये पाकिस्तानचा अबरार अहमद चमकला

पाकिस्तानचा फिरकीपटू अबरार अहमद यानं गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये जबरदस्त झेप घेतली आहे. १२ स्थानांनी झेप घेत थेट चौथ्या स्थानी विराजमान झाला आहे. आयसीसी टी २० रँकिंगमध्ये त्याचे ७०३ रेटिंग झाली आहे. आगामी काळात अशीच कामगिरी केली तर, पहिल्या स्थानी असलेल्या वरूण चक्रवर्तीला मागे टाकू शकतो. चक्रवर्ती ७४७ रेटिंगसह पहिल्या स्थानी विराजमान आहे.

श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा सहाव्या स्थानी आहे. तर बांगलादेशचा मुस्तफिजुर रहमान याच्या रँकिंगमध्ये सहा स्थानांची सुधारणा होऊन तो नवव्या स्थानी पोहचला आहे. अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खान यानंही टॉप १० मध्ये एन्ट्री केली आहे.

ऑलराउंडरमध्ये हार्दिक नंबर १

टी २० ऑलराउंडरच्या रँकिंगमध्ये हार्दिक पंड्या पहिल्या स्थानी आहे. श्रीलंकेचा वानिंदू हसरंगा आणि वेस्टइंडीजचा रोमारियो शेफर्ड यांच्या रँकिंगमध्ये एकेक स्थानाची सुधारणा झाली आहे. ते अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानी पोहोचले आहेत. हार्दिक पंड्याची रेटिंग सध्या २३८ आहे. अफगाणिस्तानचा मोहम्मद नबी २३१ रेटिंगसह त्याच्या नजीक पोहोचला आहे. पण सध्या अफगाणिस्तानचा संघ आशिया कपमधून बाहेर पडला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आदिवासींच्या जमिनी गैर-आदिवासींना भाडे तत्त्वावर देण्याचा डाव - माजी मंत्री वसंतराव पुरके

Rupali Bhosle: निळी साडी अन् केसात गुलाबाचं फूल, रूपालीचं सौंदर्य नजर हटणार नाही

Face Care Tips: ग्लोइंग अन् हेल्दी स्कीनसाठी आजच बदला 'या' सवयी, अन्यथा त्वचा होईल खराब

Marathi Actress: 'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती, ते पण नवरात्रीत'; 'बोल्ड' फोटोशूटमुळं मराठी अभिनेत्री ट्रोल

Ramlila: राजा दहशथची भूमिका साकारणाऱ्या कलाकाराने सिंहासनावरच सोडले प्राण; मन सुन्न करणारा VIDEO

SCROLL FOR NEXT