Jeera Rice Recipe : कुकरच्या २ शिट्ट्या अन् हॉटेलसारखा मोकळा जीरा राइस तयार, 'हा' सीक्रेट पदार्थ टाका रेसिपीत

Shreya Maskar

चटपटीत जेवण

रात्रीच्या जेवणाला झटपट रेस्टॉरंट स्टाइल जीरा राइस बनवा. ही रेसिपी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना खूप आवडते.

Jeera Rice

जीरा राइस

जीरा राइस बनवण्यासाठी बासमती तांदूळ, पाणी, तूप, जिरे, दालचिनी, खडे मसाले इत्यादी साहित्य लागते. याचे योग्य प्रमाण घ्या.

Jeera Rice

बासमती तांदूळ

जीरा राइस बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये बासमती तांदूळ घ्या. त्यात २ ते ३ वेळा पाणी घालून तांदूळ स्वच्छ धुवा. तांदूळ कोमट पाण्यात स्वच्छ करा.

Jeera Rice

तांदूळ शिजवा

३० मिनिटांसाठी तांदूळ कुकरमध्ये छान शिजवून घ्या. त्यानंतर कुकर थंड करून राइस एका भांड्यात काढून घ्या.

Jeera Rice

खडे मसाले

पॅनमध्ये पाणी, तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, काळी मिरी, वेलची लवंग आणि तूप घालून मिक्स करा. तुम्ही यात आणखी काही खडे मसाले टाकू शकता.

Spices

शिजलेला भात

आता शिजलेला बासमती राइस त्यात टाकून वरून तूप सोडा. त्यानंतर एका ताटात पाणी ओतून ते पॅनवर उलटे ठेवा, पाण्याच्या वाफेने भात मस्त शिजेल.

Jeera Rice

तडका बनवा

दुसऱ्या पॅनमध्ये तूप, जिरे, चवीनुसार मीठ टाकून तडका बनवा. तयार तडका भातावर छान पसरवून घ्या. अशाप्रकारे चटपटीत जीरा राइस तयार झाला आहे.

Jeera Rice

कोथिंबीर

शेवटी हिरवीगार कोथिंबीर जीरा राइसवर भुरभुरून तयार पदार्थाचा आस्वाद घ्या. गरमा गरम राइस रायता आणि पापडासोबत खा.

Coriander

NEXT : कोकण स्पेशल आंबोळी कशी बनवायची? 'हे' आहे पारंपरिक रेसिपीचे सीक्रेट

Kokan Style Amboli Recipe | SAAM TV
येथे क्लिक करा...