Shreya Maskar
सकाळच्या नाश्त्याला झटपट पौष्टिक आंबोळी बनवा. सिंपल पारंपरिक रेसिपी आताच नोट करा. हा पदार्थ लहान मुलांना खूप आवडेल.
आंबोळी बनवण्यासाठी तांदूळ, उडीद डाळ, पोहे, मेथी दाणे, तेल, मीठ, जिरे इत्यादी साहित्य लागते. यांचे योग्य प्रमाण घ्या.
आंबोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम एका बाऊलमध्ये तांदीळ, उडीद डाळ, मेथी दाणे स्वच्छ धुवून पाण्यात ५-६ तास भिजत ठेवा.
थोड्या वेळाने यात भिजवलेले पोहे घालून मिश्रण जाडसर वाटून घ्या. वाटलेले मिश्रण हवाबंद डब्यात रात्रभर ठेवून द्या. जेणेकरून ते चांगले मुरेल.
सकाळी मिश्रणात मीठ टाकून चांगले ढवळून घ्या. आता तवा गरम करून त्यावर तेल पसरवा. गॅस मंद आचेवर ठेवा.
तेल गरम झाल्यावर यात एक चमचाभर पीठ गोलाकार पसरवून आंबोळी तयार करा. 2-4 मिनिटांत आंबोळी दोन्ही बाजूंनी खरपूस भाजेल.
गरमागरम आंबोळीचा काळ्या वाटाण्याच्या भाजीसोबत आस्वाद घ्या. सकाळी 3-4 आंबोळ्या खाल्लात तर पोट खूप वेळापर्यंत भरलेले राहिल.