Ghevda Bhaji Recipe : घेवड्याची चमचमीत भाजी कशी कराल? वाचा पारंपरिक रेसिपी

Shreya Maskar

टिफिन रेसिपी

मुलांना शाळेच्या डब्यात पौष्टिक भाज्या खाऊ घाला. घेवड्याची भाजी सकाळच्या घाईगडबडीत झटपट बनवता येईल.

Ghevda Bhaji | yandex

घेवडा भाजी

घेवड्याची भाजी बनवण्यासाठी घेवडा, मोहरी, जिरे, शेंगदाणे, हिंग, तेल, ओवा, हिरवी मिरची, लाल तिखट, बटाटा, कोथिंबीर, गूळ मीठ, हळद, धणे पूड इत्यादी साहित्य लागते.

Ghevda Bhaji | yandex

घेवड्याच्या शेंगा

घेवड्याची भाजी बनवण्यासाठी घेवड्याची भाजी स्वच्छ धुवून शेंगा मोडून घ्या. त्यानंतर त्या मध्यम आकारात कापा. त्यातील बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.

Ghevda Bhaji | yandex

बटाटा सोला

एकीकडे बटाटा सोलून त्याचे लहान तुकडे करून घ्या. दुसरीकडे शेंगदाणे सोलून पातेल्यात मीठ टाकून उकडून घ्या. तसेच कोथिंबीर, हिरव्या मिरची कापून घ्या.

potato | yandex

ओवा

पॅनमध्ये तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, ओवा, हिंग, हिरवी मिरची, बटाट्याचे तुकडे घालून परतून घ्या. गॅस मंद आचेवर ठेवा.

Carom seeds | yandex

हळद

बटाटा शिजल्यावर त्यात घेवड्याची भाजी टाका. भाजीवर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या. त्यात मीठ, हळद, लाल तिखट मिक्स करा.

Turmeric | yandex

उकडलेले शेंगदाणे

घेवड्याच्या भाजीत तुम्ही थोडा गूळ घाला. जेणेकरून चव आणखी वाढेल. त्यानंतर यात उकडलेले शेंगदाणे, कोथिंबीर घालून मिक्स करा.

Boiled peanuts | yandex

भाजी-भात

तुम्ही गरमागरम भातासोबत घेवड्याची भाजीचा आस्वाद घ्या. ही रेसिपी थंडीत आवर्जून बनवा. ही खूप पौष्टिक भाजी आहे.

Ghevda Bhaji | yandex

NEXT : पीठ न आंबवता १० मिनिटांत बनवा मऊ-लुसलुशीत इडली, वाचा इन्स्टंट रेसिपी

Instant Idli Recipe | yandex
येथे क्लिक करा...