Shreya Maskar
तुम्ही पीठ आंबवण्यासाठी ठेवायला विसरला असाल तर या सिंपल पद्धतीने इन्स्टंट इडली बनवा. घरातील सर्वजण आवडीने खातील. रेसिपी नोट करा.
इन्स्टंट इडली बनवण्यासाठी तांदळाचे पीठ, रवा, दही, पाणी, इनो, सोडा, मीठ इत्यादी साहित्य लागते. ही रेसिपी पीठ न आंबवता बनवता येते.
इडली बनवण्यासाठी सर्वप्रथम बाऊलमध्ये तांदळाचे पीठ, रवा, दही आणि गरजेनुसार पाणी घालून मिक्स करा. पेस्ट जास्त घट्ट किंवा पातळ होणार नाही याची काळजी घ्या.
तयार मिश्रणात चवीनुसार मीठ आणि इनो किंवा खाण्याचा सोडा घालावा. तयार मिश्रण ३० मिनिटे बाजूला ठेवून द्या.
इनो किंवा खाण्याचा सोड्यामुळे तुम्हाला पीठ रात्रभर आंबवण्याची गरज नाही. यामुळे पीठ इन्स्टंट आंबले जाते आणि इडली मऊ- लुसलुशीत होते.
आता इडली पात्राला थोडं तेल लावून त्यात तयार सारण चमच्याच्या साहाय्याने ओतून घ्या. इडली पात्र काठोकाठ भरू नका. नाहीतर पीठ पडेल.
गॅस मंद आचेवर ठेवून इडली पात्रात २० ते २५ मिनिटे ठेवून द्या. वाफेवर इडल्या चांगल्या शिजतील. इडली पात्र थंड झाल्यावर तुम्ही इडल्या हळूवार काढून घ्या.
गरमा गरम इडलीचा पुदिन्याच्या चटणीसोबत आस्वाद घ्या. हा पदार्थ अवघ्या १५ मिनिटांत तयार होईल आणि खायला देखील टेस्टी लागेल.