मोठं कुटुंब, मोठा पगार? 8व्या वेतन आयोगात मिळणार दुप्पट वेतन?

Fact Check: आम्ही व्हायरल मेसेजची पडताळणी करतो आणि सत्य समोर आणतो...आता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात दुप्पट वाढ होणाराय...होय, मोठं कुटुंब असल्यास मोठा पगार मिळणार असल्याचा दावा करण्यात आलाय...पण, खरंच या दाव्यात तथ्य आहे का...? याची आम्ही पडताळणी केली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...
Viral message claims central government employees may receive higher salary based on family size under the 8th Pay Commission.
Viral message claims central government employees may receive higher salary based on family size under the 8th Pay Commission.Saam Tv
Published On

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीत यापुढे पत्नी, मुलांसह आईवडिलांचाही विचार होणार आहे...होय, यामुळे कर्मचाऱ्याच्या पगारात भरघोस वाढ होणार असल्याचा दावा करण्यात आलाय...8 व्या वेतन आयोग लागू झाल्यास हा फायदा होणार असल्याचा दावा केलाय...पण, खरंच अशी मागणी करण्यात आलीय का...? व्हायरल मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

8 वे वेतन आयोग लागू झाल्यानंतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीत यापुढे पत्नी, मुलांसह आईवडिलांचाही विचार होणार आहे.त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.एनसी-जेसीएमच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत ही मागणी करण्यात आल्याची माहिती मिळतेय...पण, आधीचा फॉर्म्यूला काय आहे यावरही नजर टाकूयात...

आधीचा फॉर्म्युला काय?

ही संकल्पना 1957 च्या 15 व्या इंडियन लेबर कॉन्फरन्समधून आली

किमान वेतन निश्चित करण्यासाठी कुटुंब युनिट 3 ठरवण्यात आलं

ज्यात पती, पत्नी आणि दोन मुले यांचा समावेश होता

बहुतेक वेतन आयोगांनी हाच फॉर्म्युला स्वीकारला

पण, खरंच अशी मागणी केलीय का...? याची आम्ही पडताळणी सुरू केली...याबाबत अधिक माहिती आम्ही मिळवली...त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात...

कुटुंब युनिट 3 वरून 5 पर्यंत वाढवण्यात आलेलं नाही

केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी मागणी केलीय

मागणी मान्य झाल्यास फिटमेंट फॅक्टर 3 पेक्षा जास्त होईल

कर्मचाऱ्याची पत्नी, मुलासह आई-वडिलांचाही समावेश होईल

8व्या वेतन आयोगात 3 फिटमेंट फॅक्टर नुसार बेसिक सॅलरी 54 हजार होईल

आणि 5 फिटमेंट केल्यास वेतन आणखी वाढेल...याला अनेक कर्मचारी आणि पेन्शनधारक संघटनांनी या मागणीला पाठिंबा दिलाय...आई-वडिलांची जबाबदारी असलेल्या लाखो केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे...आता ही मागणी वेतन आयोगाच्या शिफारशी आणि सरकारच्या निर्णयावर अवलंबून आहे...अजून तरी हा निर्णय लागू झालेला

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com