दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज एबी डिव्हिलिएर्स हा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. हा फलंदाज फॉर्ममध्ये असला की गोलंदाजांना सळो की पळो करु सोडायचा. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचं प्रतिनिधित्व करणारा एबी डिव्हिलिएर्स २०२१ मध्ये आपला शेवटचा आयपीएल सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता.
त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. मात्र ९ मार्चला तो पुन्हा एकदा फलंदाजीसाठी मैदानात उतरला आणि मैदानात येताच गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. दक्षिण आफ्रिकेतील चॅरीटी सामन्यात त्याने २८ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं.
एबी डिव्हिलिएर्स हा ३६० फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्यामुळे त्याला मिस्टर ३६० असेही म्हणतात. या सामन्यात फलंदाजी करताना त्याने चौकार षटकारांचा पाऊस पाडला. मुख्य बाब म्हणजे या सामन्यात त्याने ३६० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना आपलं शतक पूर्ण केलं. डिव्हिलिएर्सने २८ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्याने १५ गगनचुंबी षटकार मारले. हा सामना १५ षटकांचा होता.
डिव्हिलिएर्स हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विस्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक झळकावण्याचा रेकॉर्ड हा डिव्हिलिएर्सच्या नावावर आहे. या फलंदाजाने ३१ चेंडूंचा सामना करत आपलं शतक पूर्ण केलं होतं. वेस्टइंडीजविरुद्ध केलेल्या या खेळीदरम्यान त्याने १६ षटकार आणि ९ चौकार मारले होते. त्यावेळी त्याने ४४ चेंडूचा सामना करत १४९ धावांची खेळी केली होती.
डिव्हिलिएर्सच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं. कसोटी क्रिकेटमध्ये त्याला ११४ सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने २२ शतक आणि ४६ अर्धशतक झळकावत ८७६५ धावा केल्या. यादरम्यान २७८ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे. तर २२८ वनडे सामन्यांमध्ये त्याने ९५७७ धावा केल्या. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याने ७८ सामन्यांमध्ये १६७२ धावा केल्या.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.