Ab De Villiers StatementL: 'धोनीने CSK ची कॅप्टनसी सोडून मोठी चूक केलीये..', एबी डिव्हिलियर्स असं का म्हणाला?

Ab De Villiers On MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्ज संघाचं कर्णधारपद सोडून एमएस धोनीने मोठी चूक केली आहे असं वक्तव्यं दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने केलं आहे.
ms dhoni stepping down as captain in big mistake says ab de villiers know the reason
ms dhoni stepping down as captain in big mistake says ab de villiers know the reason twitter
Published On

Ab De Villiers On MS Dhoni Captaincy:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील सलामीचा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाला ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला आहे. हा ऋतुराज गायकवाडचा आयपीएल कारकिर्दीतील पहिलाच सामना होता.

पहिल्याच सामन्यात त्याने चेन्नई सुपर किंग्ज संघाला विजय मिळवून दिला. या सामन्याच्या एक दिवसांपूर्वी एमएस धोनीने कर्णधारपद सोडलं आणि ही जबाबदारी ऋतुराजकडे सोपवली. दरम्यान कर्णधारपद सोडून एमएस धोनीने मोठी चूक केली आहे असं वक्तव्यं दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज एबी डिव्हिलियर्सने केलं आहे.

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु होण्याच्या एक दिवसापूर्वी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेणाऱ्या एमएस धोनीबाबत बोलताना एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, ' खरं सांगू तर, आयपीएल सुरु होण्याच्या आधी कर्णधारपद सोडण्याचा निर्णय चुकीचा ठरतोय. यापूर्वीही हा निर्णय चुकीचा ठरला आहे. त्यानंतर धोनीला पुन्हा एकदा कर्णधारपदाची जबाबदारी स्विकारावी लागली होती.

ms dhoni stepping down as captain in big mistake says ab de villiers know the reason
Faf Du Plessis Statement: हातचा सामना निसटल्यानंतर फाफ ड्युप्लेसिस या खेळाडूवर भडकला, पराभवाचं कारण सांगत म्हणाला...

आयपीएल २०२४ स्पर्धेपूर्वी सोडलं कर्णधारपद..

आयपीएल २०२४ स्पर्धेला सुरुवात होण्याच्या एक दिवसापूर्वी सर्व कर्णधारांचं आयपीएलच्या ट्रॉफीसोबत फोटोशूट झालं. त्यावेळी चेन्नईच्या जर्सीत एमएस धोनीऐवजी ऋतुराज गायकवाड दिसून आला. हे पाहून क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला. त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने सोशल मीडिया पोस्ट शेअर करत एमएस धोनी कर्णधारपद सोडत असल्याची बातमी दिली.

ही जबाबदारी ऋतुराज गायकवाडवर सोपवण्यात आली आहे. यापूर्वी २०२२ मध्ये झालेल्या हंगामात एमएस धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. ही जबाबदारी रविंद्र जडेजावर सोपवण्यात आली होती. मात्र संघ चांगली जबाबदारी करु न शकल्याने त्याला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आलं होतं. (Cricket news in marathi)

ms dhoni stepping down as captain in big mistake says ab de villiers know the reason
PBKS vs DC,IPL 2024: पंजाबकडून शिखर धवन तर दिल्लीकडून रिषभ पंत कमबॅकसाठी सज्ज! अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

तसेच या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने २० षटक अखेर १७३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्ज संघाने १८.४ षटकात दिलेलं आव्हान पूर्ण केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com