PBKS vs DC,IPL 2024: पंजाबकडून शिखर धवन तर दिल्लीकडून रिषभ पंत कमबॅकसाठी सज्ज! अशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११

PBKS vs DC Playing XI Prediction: आयपीएल २०२४ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.
ipl pbks vs dc playing XI prediction punjab kings vs delhi capitals ipl 2024 cricket news in marathi
ipl pbks vs dc playing XI prediction punjab kings vs delhi capitals ipl 2024 cricket news in marathi twitter

PBKS vs DC Playing XI Prediction, IPL 2024:

आयपीएल २०२४ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. पहिल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होईल. हा सामना चंदीगडमध्ये रंगणार आहे. दरम्यान हा सामना अतिशय खास असणार आहे.

कारण गेल्या काही महिन्यांपासून संघाबाहेर असलेला रिषभ पंत या सामन्यातून कमबॅक करताना दिसून येणार आहे. तर शिखर धवन देखील मैदानावर खेळताना दिसून येणार आहे. दरम्यान या सामन्यासाठी कशी असेल दोन्ही संघांची प्लेइंग ११? जाणून घ्या.

पंजाब किंग्ज संघाकडून शिखर धवन आणि प्रभसिमरन सिंग यांची जोडी मैदानावर येऊ शकते. यासह लियाम लिविंगस्टन, जॉनी बेअरस्टो आणि जितेश शर्मासारख्या विस्फोटक फलंदाजांना देखील प्लेइंग ११ मध्ये स्थान दिले जाऊ शकते. तर गोलंदाजी आक्रमणाबद्दल बोलायचं झालं तर, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, हरप्रीत बराड आणि कगिसो रबाडाला संघात स्थान दिले जाऊ शकते. (Cricket news in marathi)

ipl pbks vs dc playing XI prediction punjab kings vs delhi capitals ipl 2024 cricket news in marathi
Ruturaj Gaikwad Statement: इथेच सामना फिरला! विजयानंतर ऋतुराजने सांगितला सामन्यातील टर्निंग पॉईंट

अशी असेल पंजाब किंग्ज संघाची प्लेइंग ११:

प्रभसिमरन सिंह, शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेयरस्टो, लियाम लिविंगस्टोन, सिकंदर रजा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अथर्व तायडे, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, कगिसो रबाडा आणि हरप्रीत बराड

ipl pbks vs dc playing XI prediction punjab kings vs delhi capitals ipl 2024 cricket news in marathi
Faf Du Plessis Statement: हातचा सामना निसटल्यानंतर फाफ ड्युप्लेसिस या खेळाडूवर भडकला, पराभवाचं कारण सांगत म्हणाला...

रिषभ पंत कमबॅकसाठी सज्ज..

दिल्लीचा कर्णधार रिषभ पंत कमबॅक करण्यासाठी सज्ज झाला आहे. गेल्या हंगामात तो खेळू शकला नव्हता. या डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श ही जोडी डावाची सुरुवात करताना दिसून येऊ शकते. तर यश धुल,रिषभ पंत आणि ट्रिस्टीयन स्टब्स हे फलंदाज आक्रमक फलंदाजी करताना दिसून येऊ शकतात. तर गोलंदाजी आक्रमणाची जबाबदारी कुलदीप यादव, खलील अहमद, मुकेश कुमार आणि एर्निक नॉर्खिया यांच्यावर असणार आहे.

या सामन्यासाठी अशी असू शकते दिल्ली कॅपिटल्स संघाची संभावित प्लेइंग ११:

डेव्हिड वार्नर, मिचेल मार्श, ललित यादव, रिषभ पंत (कर्णधार), ट्रिस्टियन स्टब्स, यश धुल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, खलील अहमद, मुकेश कुमार आणि एर्निक नॉर्खिया

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com